या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १९१ मार्फत व्यवहार न ठेवितां खुद खातेदाराबरोबर व्यवहार ठेवण्याचा अकबराने यत्न केला, तेव्हांच वरील तत्वास धक्का पोहोंचून इमारत ढासळण्यापर्यंत पाळी येऊन पोहोंचली होती. परंतु, तो लौकरच सावध झाला व कायदेकानूप्रमाणें मान्य असून ज्यांचा अंमल आहे अशा पुरातन चालीरीतींत मोठ्या बेताबाताने व सावधगिरीनेंच हात घातला पाहिजे हें त्याला समजले व त्यानें आपला हुकूम ताबडतोब फिरविला. जमाबंदी, वसूल, व चलनी नार्णे इत्यादि कारभारांत अकबराचा मुख्य सलाहगार, राजा तोडरमल हा होता. या मुत्सद्याविषर्थी मागील भागांत उल्लेख केलाच आहे. या पुरुषाचें बुद्धिवैभव फार मोठें होतें; त्याची इमानदारी कसोटीस उतरलेली होती. बादशाही दरबारांत होता स्नानसंध्यादि करें तो मोठ्या मनोभावानें करी. एके प्रसंगीं अकबराबरोबर पंजाबांत मोहिमे- वर गेला असतां निघण्याच्या गडबडीत तो आपले देव बरोबर घेण्यास विसरला. आन्हिक देवपूजा केल्याशिवाय कोणतें हीं काम न करण्याचा त्याचा नियम असल्यामुळे कित्येक दिवसपर्यंत त्यानें अन्न व पाणी वर्ज केलें होर्ते ; व अखेरीस अकबर बादशहाने मोठ्या मुष्कीलीने त्याची समजूत घातली. तरी धर्मात तो मोठा कडकडीत हिंदु होता. अकबराच्या दळभाराचा मुख्य भाग झटला ह्मणजे घोडेस्वार त्याच- प्रमाणें त्याच्या सेनेत युद्ध रचनेचे प्रसंगों हत्ती हे ढळढळीत दिसावया- चेच. - गजभार हा बादशहाच्या स्वारीचें एक द्योतक ह्मणून साधारपणे समजले जाई. ह्मणजे जेथें गजभार तेथें खास बादशहाची स्वारी असाव- याची असा बहुतेक ग्रह होऊन बसला होता; किंबहुना, गजभार नाहीं तेथें बादशहाची स्वारी असूच शकणार नाहीं असाच ग्रह झालेला होता; व यामुळें ईश्वर कृपेनें अकबराचा एक प्रबळ शत्रु कसा फसून गोल्यांत • आला हे मागील एका भागांत वर्णिलेच आहे.