या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ अकबर बादशहा. ह्या आपल्या राज्याचे विध्याद्रीच्या उत्तरेकडील भागाचे अकबर बादशा- हार्ने एकंदर वारा सुभे अथवा प्रांत केले होते. या प्रत्येक प्रांतावर राज्यकारभार चालविण्याकरितां एका अधिकान्याची नेमणूक असे. अधिकाऱ्यास - त्यास सुभा ही संज्ञा असे वरिष्ठ फक्त बादशहाच. नेकीनें वागेल तितकेच दिवस काय तो त्याचा अधिकार चालावयाचा असा नियम असे ; आणि बादशहाचे हुकूम त्यास सदा शिरसावंद्य करावे लागत. ह्याच्या हाताखालीं स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असे. या कामगारांना फौजदार ह्मणत. यांच्याकडे सेनानाय- काचे अधिकार असून शिवाय सध्याचे पोलीस खात्यांतील श्रेष्ठ कामगा- रांचे अधिकारही ह्यांचेचकडे असत. ह्यांच्याकडेसच आपापल्या निर- निराळ्या प्रांतांत सुरक्षितपणा व शांतता राखणें ; लष्करी खात्यांतील कामगारांवर देखरेख ठेवणें ; स्थानिक सेनेवर हुकूम चालविणें ; व सर्व सामान्य तंटा बखेडा न होऊं देणें ; हीं सर्व कामे असत. अकबरापूर्वी होऊन गेलेल्या अफगाण बादशहांनीं प्रजेस न्याय देण्याची जी पद्धति घालून दिली होती, त्या प्रद्धतीप्रमाणेच त्याचे कामगार न्यायार्चे काम करीत. कुराण हैं सर्व कायदेकानूंचा आधार - स्तंभ होतें. तथापि, रीतभात व मागील वहिवाटींस अनुरूप अशा रीतीनें कायदेकानूंच्या शब्दशः अर्थात थोडाबहुत फेरफार होत असे. याशिवाय, ज्या ज्या ठिकाणीं कायद्याची कडकपणाची प्रवृत्ति दृष्टो- त्पत्तीस येई, त्या त्या ठिकाणीं बादशहाच्या अगर त्याच्या अतालिकाण्या हुकुमावरून त्यांत पुनः फेरफार होत असत. न्याय व दया ह्यांचा सुसंयोग व्हावा, हें या हुकुमाचें मुख्य धोरण होतें. देहान्त शिक्षा फारच फार विचाराने व मोठ्या बेताबाताने द्यावी अशी वरिष्ठ न्याया- धिशांना ताकीद होती. एका आज्ञापत्रांत अकबर बादशहानें दूर असलेल्या गुजराथ प्रांताच्या सुभेदाराला हुकूम फरमाविला होता कीं, राज्यास घातक असाच राजद्रोहाचा गुन्हा खेरीज करून कोणत्या C