या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३ रा.

१३

अगदीं स्त्रतंत्र व आडदांड असे होते. काबूलच्या राज्यांत यावेळीं बहु- तेक झोटिंग बादशाहीच होती. कंदाहारच्या राजाचा मुलगा महमद मोकीम यानें माजी राजा अबदुल रिझाक - मागील भागांत नामनिर्देश केलेल्या अनुसय्यद याचा नातू-याजवर एकदम हल्ला करून त्यास शहरा- बाहेर हांकून लाविलें होतें. पण या राजास उद्यां काय होईल याचा विचार मुळींच नसे; व त्याचा कारभार अगदीं धिम्मे रीतीनें चालत होता ; — जणूं काय जगांत चोहोंकडे शांतताच आहे व त्यास त निदान कोठून ही भय नाहीं. या वेळेस रानोमाळ हिंडून आपले आयुष्याचे दिवस काढण्याचा कंटाळा येऊन बाबर याने खोरासन प्रांता- वर स्वारी करण्याचा निश्चय केला होता, हे पूर्वी सांगितलेच आहे. त्यानें आक्सस नदी उतरून एजरावर हल्ला केला; व तेथें कांहीं दिवस मुक्कामास राहिला. तेथील राजा सुलतान खुलू याचा मुलगा बा हा त्यास कुमक करण्याकरितां येऊन मिळाला होता. पुढें, खुनूच्या तैनातींतील मोंगल लोंकांनी बंड केलें, ही बातमी ऐकून त्या बंडापासून आपला फायदा साधून घेण्याकरितां वावर तलीकान शहरावर चाल करून गेला. या दोन गांवांच्या दरम्यान त्यास खुस्तूचे बंडखोर मोंगल येऊन मिळाले; व सुलतान खुनू बाकी राहिलेल्या सैन्यासह का बुलावर जात आहे अशी बातमी त्यास लागली. हीं दोन्हीं सैन्ये इतकीं जवळ जवळ आली की, त्यांच्या अधिपतींची सहजच भेट होऊन बोलणें- चाळणे झालें. परिणाम खुनू बाबर यास शरण आला. त्याच्या सैन्यां- तील लोकांच्या झुंडीच्या झुंडी बाबर यास येऊन मिळाल्या. याप्रमाणे शुक्ल पक्षांतील चंद्रासारर्खे बाबराचे सैन्य वाढले जाऊन त्यानें काबुलावर स्वारी केली व त्यास वेढा घालून तें शहर काबीज केलें. या अकल्पित भाग्योदयामुळे बाबर यास गिझनी व काबूल एथील राज्यपद एकदम प्राप्त झालें हें राज्य वारीस ह्या नात्यानें मिळालेल्या व गमावलेल्या फरवण्याच्या राज्यापेक्षां फारच प्रबल होतें.