या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ अकबर बादशहा. कारणं' या उक्तीप्रमाणे राजाच्या हुकुमावर आपली संपदा किंवा आपदा, सुख किंवा दुःख अवलंबून आहेत असें मानण्याचा प्रचार लोकांत अद्यापपर्यंत आहे. तेव्हां सणावाराचे व महोत्सवाचे दिवश या सर्वशक्तिमान् नरश्रेष्ठानें आपलीं राजचिन्हें दाखवावीत व त्याच्या सभोंवती प्रभुत्वदर्शक ऐश्वर्य व वैभव झळकावे अशी त्यांची इच्छा असते. अकबराला हें पूर्णपर्णे कळून आलें होतें व ह्याप्रमाणें तो वागत असे. अकबराच्या दरबारांत उत्सवानिमित्त जो भव्य थाटमाट उडत असे त्याची कल्पना मनांत ठसण्यास केवळ आईन ए अकबरींतील वर्ण- नावरच अवलंबून राहर्णे नको. त्याचे ते ५००० हत्ती, १२००० घोडेस्वार, तो लष्करी इतमाम, व त्यांतील ते छानदार, मनोरम, उत्तम सरंजामाचे व नानाविध आणि शोभिवंत रंगांचे तंबू, त्यांच्यामधील ते मोठमोठे दरबारचे दिवाणखाने, मेजवान्यांची दालने, व्यायामाकरितां काढलेले सज्जे, व विश्रांतीकरितां तयार केलेले महाल, या सर्वांचें वर्णन फारशींत लिहिणाऱ्या मुसलमान इतिहासकारांनी ही केलेलें आहे. विशेष उत्सवाचे दिवशीं दोन एकर जमीनीवर अतिशय मऊ गालिच्यांच्या बिछा- इतीच्या मध्यभागीं ज्याच्या चांदण्या येत आहेत अशा मौल्यवान् व शोभा- यमान तंबूंत बादशहा विराजमान झालेला आहे व आपल्या अमीर उमरावांचे मुजरे घेत आहे असा देखावा प्रत्येकाने वर्णिला आहे. या अमीर उमरावांचे 'तंबू देखील तसेच मूल्यवान फक्त बादशाही तंबूपेक्षां कांहीं प्रमाणानें कमी असे असत. मुजरे घेण्याचे काम आटोपल्यावर, सर्व लोकांसमक्ष नानाप्रकारच्या जिनसांनीं बादशहाच्या तुला करण्यास आरंभ होत आहे; व या जिनसा हव्या असतील त्या लोकांना वांटून देत.. बादशहाचे ऩयास जितकी वर्षे झाली असतील, तितक बकरीं, मेंढरें व कोंबडीं हीं तीं तीं जनावरें पाळणारांस दिली जात. या शिवाय अनेक लहान लहान पशूंचे उत्सर्ग होत. बदाम, पिस्ते 0