या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १९५ वगैरे लहान मेवा खुद्द बादशहा आपल्या हातानें दरबारांतील लोकांना वांटून देत असे. मोठ्या सणाचे दिवश अकबर दैदीप्यमान रत्नखचित सिंहासनावर विराजमान होई; व त्याचे सवार थाटमाटाचे पोषाख केलेले अमीर उमराव मंडलाकार बसत. नंतर "कर्णी लोंबति चामरे चमकती माळा गळा साजिऱ्या" असे व गंडस्थळ व वक्षस्थळ यांवर हिरेमाण- कांच्या पदकांनी शृंगारिलेले असे हत्ती, उत्तम वस्त्रभूषणांनीं शृंगारिलेले घोडे, गेंडे, सिंह, वाघ, शिकारीचे चित्ते, बिवर्टे, शिकारीचे कुत्रे, बहिरी ससाणे इत्यादिकांची सलामी होई. व अखेरीस लखलखीत वस्त्रा- लंकारांनी विभूषित अशा घोडेस्वारांची सलामी होऊन हा समारंभ आटपे. हे केवळ कल्पनासृष्टीचें चित्र नव्हे. कारण अकबराचा मुलगा व वारस जहानगीर याचे राज्यांत हा दरबारचा सर्व थाटमाट व डामडौल हॉकिन्स, रो व टेरी या गृहस्थांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, व या भव्य देखाव्याचे वर्णन या प्रसिद्ध प्रवाशांनी अत्यंत वेधक शब्दांनीं केलें आहे. हे असले समारंभ मोठमोठ्या उत्सवांचे दिवश व सणावारींच दृष्टीस पडत. इतर वेळीं अकबर साधा, प्रांजल, कळकळीचा, व सदैव सत्यशोधक असा असे. त्यानें केलेलें काम तो असाच मनुष्य असावा 1. अशी साक्ष देतें हैं काम ह्मणजे मागील चार शतकांत मुसलमान जेत्यांनी जिचे तुकडे तुकडे करून टाकिले व त्या शतकांच्या अखेरीस देखील जी अझून ही अव्यवस्थित व विस्कलित राहिली होती, अशी हिंदुस्थानची बादशाही एकवट व दृढ करणें हें होतें; या चारशे वर्षांत अफगाण जेत्यांनी कुराणांतील तत्वांचा हटवादीपणाने भलभलता ओढूनताणून अर्थकरून त्या जोरावर हिंदूप्रजेस लुटून नागविलें. बरापूर्वी होऊन गेलेल्या बादशहापैकीं अतिशय शहाणा व इंग्लिश इति- - हासकारांनी उदार व दयाळू या विशेषणांनी नावाजलेला असा जो अक-