या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ अकबर बादशहा. सुलतान फिरुझ, यानें आपल्या पेगमबराचा पंथ ज्यानीं स्वीकारिला नाहीं, अशा लोकांना आपण कसें छळिलें हें आपल्या तोंडानें कबूल केलें आहे. अकबर राज्यपदारूढ झाला तेवेळीं ही मनोदेवतेनिमित्त छळ करण्याची ही तत्वें फार झपाट्याने सुरू होतीं. ती फक्त त्यानेच स्वतः प्रथम नाहींशी करून टाकिलीं. सर्व हिंदुस्थान एकछत्राखालीं आणून त्यांत ऐक्य स्थापन करावें, असा अकबराचा थोर विचार होता. धर्माच्या बाबतींत ऐक्य होणें अशक्य आहे, हें त्यास आपल्या कारकीर्दीचे प्रारंभींच कळून चुकलें. तेव्हां जें ऐक्य करावयाचें तें प्रजाजनांच्या हिताहितासंबंधींचेंच होईक हें त्याने जाणिलें. अशा प्रकारचें ऐक्य स्थापन करण्यास ज्या अवश्यक गोष्टी आहेत त्यांत देश काबीज करून एकछत्र स्थापणें ही पहिली होती. दुसरी गोष्ट ही की, सर्वांच्या मनोदेवतेच्या आणि ईश्वरोपास- नेच्या हरएक सांप्रदायास स्वातंत्र्य देऊन त्याचा आदर राखणें. ही कल्पनासिद्धीस नेण्याकरितां महमुदीयधर्मविधि, अकबरानें थोडेसें रूपांतर करून स्वीकारिला. " परमेश्वर एकच आहे व महमद हा त्याचा पेगमबर आहे" हें जें जुनें धर्मवाक्य, कीं ज्याच्यामुळे परधर्मी प्रजेचे छळ करण्याकरितां अनेक प्रकारचे मार्ग काढण्यांत आले, त्याच्या ऐवर्जी " परमेश्वर एकच आहे व अकबर हा त्याचा पृथ्वी वरीक प्रति- निधी आहे" असा नवीन सुधारलेला पाठ त्याने स्वीकारिला. परमे- श्वर कायतो एकच आहे ह्या सत्याचा एका जागींच्या मूर्तिपूजकांस उपदेश करण्याकरितां पेगमबरानें अवतार घेतला व महमद हा या लोकांना शुभवर्तमान कळविणारा एका रीतीनें देवदूत होता हैं अक- बरार्ने मान्य केलें. पण या देवदूतानें जे विधिमार्ग घालून दिले व ज्यांचा संग्रह कुराणांत केलेला आहे, त्यांचा अर्थ, एकेश्वरी मताचा उपदेश तरवारीच्या धारेनें करावा, असा करण्यांत आला, हें अनुचित होय असें तो प्रतिपादी.