या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १९७ कुराणांतील विधींचा हा केलेला अर्थ अकबराच्या मतें अगर्दी खोटा होता, व त्याप्रमाणें वागल्यामुळे निदान हिंदुस्थानांत. तरी तो फलद्रूप झाला नाहीं. अकबराचे पूर्वीचा चारशांहून अधिक वर्षांचा काळ हा याविषयीं साक्ष देत होता. अशा तत्वावर चालविलेल्या राज्यपद्धतीनें प्रजेची अनुरक्ति नष्ट होणे अपरिहार्य आहे, असें अकबरास आपल्या कार- कीदींच्या एकविसावे वर्षास प्रारंभ होतो न होतो इतक्यांतच कळून चुकलें. आपल्या सर्व प्रजांना एकत्र करणें, त्यांना आपलेसे करून टाकर्णे, प्रेमबंधनांनी त्यांना एकमेकांशी सांधणे, व त्या सर्वात सामा- यिक हित साधील अशा तत्वांची पेरणी करणे, हा अकबराचा मुख्य हेतु होता है पुनः पुनः सांगितलें तरी अधिक होणार नाहीं. निर्दिष्ट केल्याप्रमाणे फेरफार केलेल्या महमुदीय धर्मातच या तत्वाचा अंकुर व्यास दृष्टोत्पत्तीस आला. महमदाच्या वचनांचा खोटा अर्थ करून त्यांचा दुरुपयोग केल्यामुळे प्रजाजनांत बेबनाव मात्र होणार ; म्हणून आपल्या राजवट्यांत व आपल्या शतकांत अकबर स्वतःच पेगमबर होण्यास तयार झाला; व सर्व शक्तिमान् प्रभूच्या उदार व दयाशील आज्ञांचा अर्थ करून सांगणारा मीच आहे असें त्यानें जाहीर केलें. वर उलट- कुराणाचा अर्थ करून सांगण्याचा अधिकार जोपर्यंत आपणांकडे आहे तोपर्यंत प्रबळ धर्म ह्मणजे तरवारीच्या जोरावर चालणारा धर्म असें कधींही होऊं द्यायाचें नाहीं असा अकबराने निश्चय केला. पक्षीं त्या धर्मापासून सर्व हिंदुस्थानभर आराम उत्पन्न व्हावा, मागील धर्मच्छलाचें स्मरण नाहींसें व्हावें, व विचारस्वातंत्र्य सर्वत्र जाहीर करून धर्मस्वातंत्र्य पूर्ण चालू ठेवावे, अशी त्याची व्यवस्था होती. या प्रका- रचा फरक साधारणतः लोकसंमत झाल्यावर प्रजेचें संरक्षण करून तीस जाचणूक करणार नाहीं, अशा एकाच बादशहाचें सार्वभौमत्व तुझी मान्य केरा, ह्मणून हिंदुस्थानांतील राजांना व अनेक लोकांना आळवून ह्मण-