या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ अकबर बादशहा. ण्याचें अकबराने योजिलें होतें. राजकीय व सामाजिक गोष्टींत सुधा- रणा करून त्यांचें पुनरुज्जीवन करण्याचे खटपटीस लोकांची मदत मागा- वयाची तिचा उद्देश, स्वहित साधणे हा नसून, परकीय लोकांच्या स्त्राऱ्यांनीं, आपसांतील लढायांनों, व या दोहोंच्या मागून येणाऱ्या धर्म- च्छलानें, चार शतकेंपर्यंत गांजून गेलेल्या प्रजाजनांचे हित व्हावें हा होता. अकबराने ज्या लोकांस आळविण्याचा हा प्रयत्न केला ते लोक विचारशून्य व दुराग्रही नव्हते. फक्त एक चितूरचा ( हल्लींच्या उदेपूरचा ) राणा खेरीज करून बाकी सर्व रजपूत राजे व हिंदुस्थानच्या सर्व मुख्य प्रांतांतील लोक त्यात या गोष्टीस अनुकूल झाले. त्यांच्यांतील अति- शय बलाढ्य संस्थानें जयपूर व जोधपूर यांकडून बादशहास, हिंदू, परंतु जे त्याचे अतिशय भरंवशाचे सेनापति झाले, असे लोक सल्ला मसलती- साठीं व उत्तम फौज लढण्यासाठी मिळाली. या बाबतींत त्यास मुख्य विरोध केला तो त्याच्याच जातीच्या दरबारांतील हटवादी मंडळीनीं व बंगाल, ओरिसा व पश्चिम हिंदुस्थान या प्रांतांत चिरस्थायी झालेल्या अफगाण स्वारी करणाऱ्या घराण्यांतील वंशजांनीं त्याचें हित- करकार्य सिद्धीस जाण्याकरितां या लोकांना आपलेसे करून घेणे अंग- त्याचें होर्ते. ह्यांनीं आपलें सार्वभौमत्व मान्य करावें, ह्मणून अकबराने प्रथमतः त्याचे मन वळविण्याची खटपट केली. त्यांनी बंड करण्याची संधि मिळावी, येवढ्याच करितां प्रथमतः हें सार्वभौमत्व मान्य केलें. तेव्हां त्यांच्यावर स्वारी करून त्यांना जिंकण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाहीं. याकरितां, त्यांना त्यानें जिंकिले; व विजय मिळतांच त्या त्या प्रांतांत विचारव ं आचार ह्यांचें स्वातंत्र्य, चांगले व सर्वोस सारखे लागू पडतील असे कायदेकानू, व सर्वत्रांस समान न्याय, इत्यादि हितकारक गोष्टी प्रसृत झाल्या. याप्रमाणें हिंदुस्थानावर स्वारी करणारे मुसलमान जेत्यांपैकीं, प्रथ मतः जिंकिलेल्या प्रांतांचें एकीकरण केलें व त्या सर्वात एकछत्र पाद - "