या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. १९९ शाही स्थापिली ती अकबराने. ही पादशाही दक्षिण खेरीज करून सर्व हिंदुस्थानची होती. याच गोष्टींनी पुढील पिढ्यांकडून वाहवा मिळविण्याचा अधिकार अकबरास प्राप्त झाला. त्यानें केलेले महत्- कृत्य आपण लक्षपूर्वक पाहिले आहे; व त्याच्या हेतूंचे हृद्रतं आपणाला कळून आले आहे. तेव्हां त्याच्या अंतःकरणाची विशुद्धता आपणास कळते. ईश्वराप्रमाणे आपली आराधना करून लोकांनीं आपल्या आज्ञेत वागावे अशी अकबराची इच्छा होती असें जें त्याच्या दरबारांतील हटवादी लोकांनी झटलें आहे तशी खचित त्याची इच्छा नव्हती. छे! अशा प्रकारची अभिलाषबुद्धि त्याच्या मनमानसीं देखील येण्या- सारखी नव्हती. परोपकाराचीं, आचारविचार ह्यांच्या स्वातंत्र्याचीं, व श्रद्धादि भेदांचा मनांत विचार न आणितां सारखा न्याय करण्याचीं जीं खऱ्या धर्माचीं उदार तवें, त्यांचा लोकांत उपदेश करण्यासाठी महमद पेगमबर ज्या धर्माचा देवदूत अवतरला होता त्या धर्माचा मी ही एक अर्थ करून सांगणारा आहे, येवढेच काय तें त्याने जाहीर केलें होतें. व विशेषतः राज्यसंस्थापकांस जी राजनीति अत्युदार तीच अकबरानें उचलली होती. राजास " सर्व धर्मपंथांत चांगलें म्हणून आहेच; तेव्हां त्यांतील चांगले तेवढे घेऊन बाकीचे टाकून देऊं " हें अकबराचे प्रमाणवचन होऊन बसले. हिंदूधर्माची प्रवृत्ति सौम्य व सात्विक रीतीची आहे; त्यांन व कुटुंबाविषयीं प्रीति बहावी अशी आज्ञा आहे ; व परधर्मीयांस आपल्या धर्मात आणण्याचा प्रयत्न करूं नये असा उपदेश आहे, या गोष्टींत त्यास त्याचें श्रेष्ठत्व दिसून आलें. पारशी लोकांच्या साध्या धर्मात ही त्यास सत्याचें स्वरूप दिसलें; व ख्रिस्तीधर्मांत ही ते दिसलें. सर्वात चांगलें ह्मणून कांहीँ आहेच,' त्याप्रमाणें सर्व जातीच्या मनुष्यमात्रांत ही कांहीं चांगले आहे, असा त्याचा समज होता; आणि ह्मणूनच तो अतिशय