या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० अकबर बादशहा. सहनशील असे. जोपर्यंत ताळ्यावर आणितां येण्याची कांहीं आशा आहे तोपर्यंत एखाद्याला शासन करण्याची बुद्धि त्याला होत नसे. त्यास क्षमा करण्याची अति आवड असे. "जा, पुनः पापकर्म करूं नकोस" हैं एक त्याचें प्रमाणवचन होतें व तेंच त्याच्या वर्तनांतील सार होतें. हा मोंगल बादशाही स्थापन करणारा अकबर होऊन गेला; व ज्यांच्या योगानें त्याला ती बादशाही स्थापितां आली. तीं तत्वें अर्शी होतीं. त्या तत्वांना धरून वर्तन झालें असतें तर बादशाह कायम राहिली असती; व सांप्रत त्याच तत्वानुसार वर्तन ठेऊन अकरामागून आलेले पाश्चिमात्यलोक ही आपकी बादशाही कायम राखीत आहेत. येथपर्यंत अकबराचे व त्याच्या महत्कृत्यांचे वर्णन अशा तन्हे आहे की जण काय आपण त्याची सांप्रतच्या राजाशीच तुलना करीत आर्हो. अलीकडील दोनशे वर्षांचा अनुभव व ज्ञान त्याला नव्हतें तरी देखील आजकालच्या राजाशी त्याची बरोबरी साजेक. युरोप खंडांत त्याच्या समकालीन झालेले राजे आपआपल्या देशांत अति विख्यात होऊन गेले. उदाहरणार्थ, अकबर हिंदुस्थानांत स्थिरस्थावर करीत असतां इंग्लंदांत इलिझाबेथ राणी राज्य करीत होती, व फ्रान्स देशांत चत्रथा हेनरी राज्यपदारूढ होता. या विख्यात राज्यकर्त्यांशीं देखील अकबराची बरोबरी केली असतां संकोच वाटण्याचें मुळींच प्रयोजन नाहीं. त्याच्या पश्चात राहिलेल्या महत्कृत्यांवर त्याचा कीर्तिध्वज उभा- रिलेला आहे. त्याच्या मागून गादीवर बसलेला जहानगीर बादशहा, हा जर हुमायुनाच्या नंतर तक्तावर बसला असता तर, वडिलोपार्जित मिळा- केल्या अगर बाहुबलार्ने जिंकिलेल्या विस्कळित प्रांतांत त्याला खचित ऐक्यता स्थापन करितां आली नसती किंवा त्यांतील प्रजाजनांस अनुकूल ही करून घेतां आले नसते; अशी सर्व साक्ष देतील. त्याचा स्वभाव तामशी