या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १२ वा. २०१ व हट्टवादी असल्यामुळे अशा प्रकारचें जोखमीचें काम त्याला अगर्दी अशक्यच झालें असतें. परंतु, आपल्या बादशाहीचा पाया अकबराने इतका खोल नेला होता कीं, त्याचा मुलगा त्याच्याहून इतका निराळा असतांही बापाने श्रेष्ठत्वांवर एकत्र केलेली बादशाही त्याला सांभाळितां आली. अकबरानें काय काय केलें, ते कोणत्या काळांत केलें, व तें साधण्या- साठीं त्यानें कोण कोणत्या पद्धतींची योजना केली; ह्याचा आपण विचार केला ह्मणजे संकटांनीं राष्ट्र ग्रासिलें असतां कोट्यावधि लोकांच्या सौख्याचें साधन जी देशांतील शांतता व विचार आणि आचार ह्यांर्चे स्वातंत्र्य, त्यांच्या द्वारें त्याची मुक्तता करण्यास्तव परमेश्वर ज्या महापुरुषांच्या विभूति निर्माण करितो त्या कोटीपैकीं अकबर हा एक महापुरुष होता असें आपणास कबूल करावेच लागतें. 26 समाप्त: