या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐतिहासिक, भूगोलविषयक व अवंतर माहितीच्या टिपा. मोंगल (पान १, ओळ १. ) :- मानवी प्राण्यांचे एकंदर पांच वर्ग केले आहेत. काकेशियन, मँगोलियन, इथियोपियन, मले आणि अमेरिकन. त्यांपैकी दुसऱ्या वर्गात मोंगल लोकांचा समावेश होतो. याच वर्गाला टयुरेनियन असेही म्हणतात. तिबेट, तार्तरी, जपान, सियाम, लॅपलंड, तुर्कस्थान इत्यादि देशांत राहणारे लोक या जातीत मोडतात. हे लोक एके ठिकाण वसाहत करून न राहता चोहोंकडे भटकत फिरणारे आहेत. प्राचीन काळीं सिथियन व हून या नांवानें हे लोक प्रसिद्ध होते. मध्यकाळांत याच लोकांना मोंगल, तार्तार व तुर्क असे म्हणू लागले. इ० स० १३ व्या शतकाच्या प्रारंभ चेंगी- जखान नांवाच्या सरदाराने संपूर्ण मध्य एशिया व पूर्व एशिया हे पादाक्रांत केले होते. पुढे याच घराण्यांत तैमूरचा उदय झाला. आणि त्याच्याच वंशांतील एका शार्खेत बावर जन्मला व त्यानेंच दिल्ली येथे १६ व्या शतकांत आपल्या राज्यांची स्थापना केली. त्यालाच मोंगल बादशाही असें ह्मणतात. समरकंद (पान ८, ओळ ९. ) : - हें शहर हिंदुकुश पर्वताच्या उत्तरेस तुर्क- स्थानांत आहे. प्राचीन काळी, विशेषतः टयमूरलेनच्या राजवय्यांत तें वैभवाच्या अत्यंत शिखरास जाऊन पोहोंचलें होतें. तेथेच त्यानें आपली राजधानी स्थापिली होती. तें महमुदीय विद्येचें शेकडो वर्षेपर्यंत आदिपीठ होऊन बसलें होतें. परंतु सांप्रत त्याची अवस्था फार दीनवाणी झाली आहे. इ० स० १८६८ त हैं शहर रशियाचे राष्ट्रास जोडिलें गेलें. टायर (पान ८, ओळ १२. ) : – यास टयमूरलेम (Lame ) असेंही इंग्लिश इतिहासकार म्हणतात; कारण लढाईत जखम लागल्यामुळे तो एका पायाने लंगडा (लेम ) झाला होता. त्याचा स्वभाव क्रूर व निर्दयी असून तो तरवारबहादर व पहिल्या प्रतीचा धाडसी होता. बालपणीच तो योद्धा बनला. वयास बारा वर्षे पुरी होतात न होतात तोच तो दिग्विजयास निघाला. त्यानें राशया, इराण बंगेरे देश पादाक्रांत करून समरकंद येथे आपली राजधानी स्थापिला. इ० स० १३९७ त तो हिंदुस्थानावर स्वारी करण्याकरितां निघाला. "यथतर त्यानें आपल्या पराक्रमाची व निष्ठुर स्वभावाची पराकाष्ठा केली. मार्ट-