या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिपा. २०५ तील प्रदेश उध्वस्त करीत तो दिल्लीवर चालून गेला. तेथें त्यानें बंदिवान केलेल्या लोकांची जी कत्तल उडविली तिच्या वर्णनानें अंगावर शहारे उभे राहतात. आपल्या नांवाचे हिंदुस्थानांत नाणे पाडून तो तुर्कस्थानांत परत गेला. तो १३३६ त जन्मला व १४०५ त मरण पावला. चेंगीझखान (पान ८, ओळ १३.) : - हा शब्द जेंगीझखान् याप्रमाणें लिहि- ण्याचा व उच्चारण्याचा सांप्रदाय विशेष आहे. हा पुरुष एका लहानशा मंगो- लियन संस्थानिकाचा पुत्र होता. तो फारच प्रतापशील व रणधीर निपजला. इ० स० १२०५ यावर्षी त्याने चीनदेशावर स्वारी करून तेथील राजधानी हस्त- गत केली. त्याने इ० स० १२९८ त आपल्या बाहुबलानें समरकंद व बुखारा ह्रीं शहरे सर करून दोनलाख लोकांची कत्तल उडविली. त्याचें राज्य फार विस्तीर्ण होतें. त्यांत चीन, तार्तरी व इराण यांचा समावेश होत असे. तो इ० स० ११५५ त जन्मला व १२२७ त मरण पावला. ऑक्सस (पान ८, ओळ २० . ) : - या नदीला सांप्रत अमू आणि झिहून अर्शी ही नांवें आहेत. इचा उगम तुर्कस्थानांत सारिकोला नांवाच्या सरो- घरापासून आहे व ती बदंकशान, बुखारा आणि खीवा या प्रांतांतून वाहत जाऊन आरल समुद्रास जाऊन मिळते. तिची लांबी ११५० मैल आहे. झगझारटीस (पान ८, ओळ २०० ) : – या नदीचा उगम थियानशन पर्वता- पासून आहे. व ती आरल समुद्रास जाऊन मिळते. सांप्रत ती सिहून किंवा सरदारिया म्हणजे पीत नदी या नांवानें प्रसिद्ध आहे. डाडेनेलीस (पान ९, ओळ ५. ) :- ही एक लहान सामुद्रधुनी, यूरोप आणि एशिया यांचेमध्ये असून इच्या योगानें मार्मोराचा समुद्र व प्रीशियन आर्चिपेटेगो हे जोडलेले आहेत. अवसय्यद ( पान ९, ओळ १०. ) : – चेंगीझखानाच्या वंशांतील हा शेव- टला सुलतान होता. तो इ० स० १३३६ त मरण पावला. युझवेक अथवा युझवेग (पान १०, ओळ २६. ) :—३ तुर्कजातीचे ठोक आहेत. यांनी १५ व्या शतकाच्या अखेरीस तुर्कस्थानावर स्वाया करून त्यांतील संस्थानें हस्तगत केली. त्या प्रांतांत अद्याप ही त्याच लोकांचा अंमल चाल आहे. या लोकांचे वास्तव्य स्वतंत्र तार्तरी, चिनी तार्तरी व रशियन तार्तरी या देशांत आहे. खीबा, बुखारा, खोकन व रशियन तार्तरी या निरान- राळ्या प्रांतांत राहणाऱ्या युझवेग लोकांची भाषा व आचार विचार हे एकमे- कांहून भिन्न आहेत. या लोकांस गायन कलेचा व कवितेचा फार नाद आहे.