या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ अकबर बादशहा. यांच्या मूळ सरदाराचे नांव युझवेग होते व त्यावरूनच हल्लींचे जातिवाचक नांव त्यांस पडलें आहे. खोरासन (पान १२, ओळ १०. ) : - इराणांतील प्रांतांत हा फारच विस्तीर्ण प्रांत आहे. याचे क्षेत्रफळ २,१०,००० चौरस मैल असून त्यापैकीं एक तृती- यांश लवणमय निर्जन प्रदेश आहे. बाकीच्यांत बराचसा भाग वालुकामय असून राहिलेला भाग मात्र सुपीक आहे. प्राचीनकाळीं यांत अनेक कालवे व पाट- स्थळें होतीं, परंतु सतत लढाया व दंगेधोपे झाल्यामुळे सांप्रत चोहोंकडे बंडाळी व अव्यवस्था माजलेली आहे. कावूल (पान १२, ओळ १८ . ) : - हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेकडील अफगा- णिस्थानाच्या प्रदेशाला हॅ नांव दिलेले आहे. फार प्राचीन काळापासून हा भाग इतिहासांत सुप्रसिद्ध आहे. काबूल नांवाच्या शहरावरून या प्रदेशास हैं नांव पडलें आहे. या शहराभोंवर्ती प्राचीन काळी मातीचा परिकोट होता; पण सांप्रत तो नष्ट झालेला आहे. सुलतान बावरच्या वेळीं हेंच शहर मोंगल राज्याची राज- धानी होतें व सांप्रत ही इ० स० १८६८ पासून या शहरास अफगाणिस्थानाचें राजधानित्व आले आहे. अगर्दी अलीकडे येथें अनेक ऐतिहासिक उलाढाली घडून आल्या. इ० स० १८३९ त इंग्लिश लोकांनीं तें काबीज करून घेतले; परंतु, पुढील साली फंदफितुर होऊन बंडावा झाल्यामुळे तें त्यांस सोडून द्यावें लागलें. गिझनी (पान १२, ओळ १८ . ) : - हें शहर अफगाणिस्थानांत आहे. हैं ठिकाण निसर्गतःच फार मजबूत असून याच्या सभोवती ३५ फूट उंचीचा परि- कोट व पाण्याने भरलेला खंदक असल्यामुळे त्याची मजबुती द्विगुणित झालेली आहे. इ०स० ११ व्या शतकांत गिझनी नांवाच्या प्रवल घराण्यानें जें विस्तीर्ण राज्य स्थापिलें त्याची राजधानी हेंच शहर होते. इंग्रज लोकांनी इ० स० १८३९ या वर्षी लॉर्ड कीनच्या अधिपत्याखाली या शहरावर हल्ला करून तँ सर केलें, परंतु, अखेरीस बाकीच्या प्रदेशासमेंत तें ही दोस्त महमदाच्या स्वाधीन केलें. या शहरावरून आसमंतातच्या प्रदेशांसही तेंच नांव पडलें आहे. कंदाहार (पान १३, ओळ २.): - हें काबूलची पूर्वीची राजधानी होतें. हैं शहर फार सुरक्षित असून सुपीक प्रदेशांत वसलेलें आहे. प्रख्यात शिकंदर बाद- शहाने याची स्थापना केली असें म्हणतात. यांच्या आसमंतांतील प्रदेश महा- भारतांत वर्णिलेला गांधार देशच असावा असा आधुनिक विद्वानांचा समज आहे. महमूद गिझनी (पान २१, ओळ १०.) :- :- अफगाणिस्थानांत गिझनी येथें एक प्रख्यात राजघराणे होऊन गेलें त्यास गिझनी असें नांव आहे. या घराण्यांचा