या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिपा. २०७ मूळ संस्थापक सबक्तगीन हा होता. याचाच मुलगा महमदगिझनी बापामागून इ० स० ९९६ त तो राज्यपदारूढ झाला. त्यानें हिंदुस्थानावर १७ स्वाया करून अपार संपत्ति मिळविली. या देशांतील मोठमोठाली देवालयें लुटून फस्त केली, व पंजाब प्रांतांत आपला अंमल सुरू केला. परंतु, या काळच्या अखे- रीस घोरी घराण्यांतील सुलतानांनी त्याचा पाडाव करून आपली गादी स्थापिली. ब्राह्मणधर्म (पान २१, ओळ १६. ) : - म्हणजे हिंदुधर्म याविषय फारसे लिहावयास नकोच. बुद्ध अथवा बौद्ध (पान २१, ओळ १६ . ) : – या धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध या नांवानें प्रसिद्ध असलेला कपिल-वस्तूचा राजपुत्र सिद्धार्थ हा होय. अगदीं बालपणापासून याचें मन संसाराविषय विरक्त होतें. गृहनिवास फार त्रास- दायक आहे; ही पातकमय स्थिति घर सोडल्यानेंच नष्ट होऊन मनुष्यास स्वातंत्र्य मिळणार आहे, असा विचार करून भरजवानांत नाना प्रकारच्या ऐपआरामास व राज्योपभोगास लाथ मारून गौतम अरण्यांत निघून गेला. संसार पापमय म्हणून कटमय आहे असें यास समजून आलें. तो जागृत होऊन ज्ञानी झाला. यावरून त्याला बुद्ध असें ह्मणूं लागले. या धर्माचीं रहस्यें येणेंप्रमाणे आहेत:- (१) संसार दुःखमय आहे; (२) तृष्णा दुःखाचें साक्षात कारण होय; (३) दुःख नाहींसें करावयाचे असल्यास इच्छा समूळ हाकलली पाहिजे; ( ४ ) हैं साध- ण्याचा सुलभ उपाय म्हणजे अष्टगुणात्मक धर्ममार्ग होय. हा अष्टगुणात्मक पवित्र धर्ममार्ग असा आहे :- (१) योग्य श्रद्धा; (२) योग्य निश्चय; (३) योग्य भाषण; ( ४ ) योग्य कर्म; ( ५ ) योग्य आचरण; ( ६ ) योग्य प्रयत्न; ( ७ ) योग्य विचार, आणि ( ८ ) वृत्ति विरोध. याप्रमाणे आचरण केलें असतां मनुष्यास निर्वाणपद (स्वर्गसुख) प्राप्त होतें. हा धर्म हिंदुस्थानांत स्थापित झाला, परंतु श्रीशंकराचार्यानें त्याचें निर्मूलन केल्यामुळे आजमितीस त्याची थोरवी भरत वर्षांत मुळींच राहिली नाही. सांप्रत तो फक्त नेपाळांत प्रचलित आहे. परंतु ब्रह्मदेश, तिबेट, चीन, व लंका या देशांत त्याचेंच प्राबल्य आहे. जैन (पान २१, ओळ १६ . ) : – या धर्माची स्थापना बुद्धधर्मानंतरची आहे. जिन नांवाच्या साधुपुरुषानें त्याची स्थापना केली म्हणून त्यास जैन असें नांव प्राप्त झालें. या धर्मांतील लोकांस अर्हत असेही म्हणतात. " अहिंसा परमो- धर्मः” हें त्याचें मुख्य रहस्य आहे. नरदेहालाच पुण्याचरणानें मोक्षप्राप्ति होते असें यांत सांगितले आहे. त्यांत वेदाला मान नाहीं. मेवाड व मारवाड हें त्याचें माहेरघर असून उत्तर हिंदुस्थानांत त्याचा विस्तार फार आहे. गुजराथेंत