या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ अकबर बादशहा. व मलबार किनान्याच्या उत्तर बाजूस ही या धर्माचे अनुयायी पुष्कळ आहेत. यति श्रावका, दिगंबर व श्वेतांबर असे यांचे अनेक पंथ आहेत. घोर अथवा घूर (पान २२, ओळ ४.) : - या घराण्याचा संस्थापक शहा- बुद्दीन हा होता. महमूद घोरी या नांवानें हा इतिहासांत प्रख्यात आहे. यानें हिंदुस्थानावर स्वारी करून स्थानेश्वर येथें इ० स० ११९३ त पृथु राजांचा परा- भव करून मुसलमान बादशाहीची स्थापना केली. त्याच्या पदरीं कुतुबुद्दीन नांवाचा एक शूर व प्रबळ सरदार होता. तोच त्याचे मागून हिंदुस्थानच्या गादीवर बसला. त्याला व त्याचे वंशजांना गुलाम वंशांतील राजे असा ह्मण- याचा परिपाठ आहे. खिलजी (पान २२, ओळ ५:): - हे लोक मूळचे अफगाण अथवा पठाण जातीचे होते. जलालउद्दीन त्यांचा मुख्य नाईक होता. कैकोबाद बादशानें त्याला आपला वजीर केला होता; परंतु यानें त्यास पदच्युत करून त्याचा खून केला व आपणच त्याची गादी बळकाविली. खिलजी घराण्यांत इ० स० १२९० पासून १३२० पर्यंत तीस वर्षे बादशाही राहिली. परंतु येवढ्या अवका- शांत त्यांनी मुसलमानांची राज्यसत्ता महाराष्ट्रांत व गुजराथेंत नेऊन पोहोचविली. तघलख (पान २२, ओळ ११.) : - खिलजी बादशहाच्या पदरी गाझीवेग तघलघ नांवाचा एक सरदार होता. त्यानें गादीवर असलेल्या बादशहास कंठस्नान घालून दिल्लीचे तक्त बळकाविलें व आपणास ग्यासउद्दीन तघलखशहा असें नांव घेतलें. हाच तघलख घराण्याचा मळपुरुष. या घराण्यांत इ० स० १३२० पासून तो १४१२ पर्यंत सुमारें एका शतकांत आठ बादशहा होऊन गेले. सय्यद (पान २२, , ओळ १९.) : - हिंदुस्थानावरील स्वारी आटोपून टायमूर स्वदेशी परत जात असतां त्याने सय्यद खिजरखान नांवाच्या सरदारास मुल- तानाचा सुभेदार नेमिलें, त्याने लवकरच ही नांवाची ताबेदारी झुगारून दिली. व तो आपण स्वतंत्रपणे दिल्लीचा बादशहा बनला. त्याचे मागून त्याचा मुलगा, नातु व पणतु हे राज्यपदारुढ झाले. हेच सय्यद घराण्यांतील पादशहा. इ० स० १४१४ पासून १४५०पर्यंत या घराण्यानें दिल्लीच्या बादशाहीचा अनुभव घेतला. लोदी (पान २२, ओळ २३.) : - बहलोलखान लोदी हा मूळचा लाहोरचा सुभेदार होता. त्यानें दुर्बळ सय्यदांना पदच्युत करून वादशाहीपद बळकाविलें. त्याचे मागून त्याचा मुलगा व नातु हे गादीवर बसले. यांच्या राजवयांत पठाण बादशाहीचा अंत होऊन मोंगल बादशाहीचा उदय झाला. इ० स० १४५० पासून तो १५२६ पर्यंत या घराण्यानें बादशाही वैभव भोगिलें.