या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिपा. २०९ नॉरमन लोक (पान २५, ओळ २२.) : - फ्रान्स देशाच्या उत्तरेस नॉर- मंडी नांवाचा एक प्रांत आहे. तेथील लोकांना नॉरमन्स असें ह्मणत. दाहाव्या शतकाच्या प्रथमार्धात विजयी वुइलयम् या नांवाचा ड्यूक तेथें राज्य करीत होता. त्याने इंग्लंदावर मोहीम करून इ० स० १०६६ त सिन्ल्याक् येथें दुसरा हेराल्ड' या राजाचा पराभव करून आपण त्या राज्यपदारूढ झाला. तेव्हां इंग्लंदांत नॉर- मन लोकांचे प्राबल्य फार माजलें. इंग्लंडचे मूळचे रहिवाशी सॅक्सन लोक या पराजयामुळे परकीय राज्याच्या अमलाखालीं गेले. विजयी वुइलियम राजा होतांच त्यानें सर्वसत्ता आपल्या अनुयायी मंडळींच्या स्वाधीन केली व इंग्लं- डांतून नेलेल्या लुटीनें आपल्या प्रांतांतील देवस्थानांची भरती केली. यावेळीं, इंग्लिश लोकांची स्थिति फार शोचनीय झालेली होती. अधिकार व सन्मान यांस ते मुकले, इतकेंच नाहीं तर त्यांचीच जमीन त्यास पारखी झाली. विजयी नॉरमन् लोक पराभूत झालेल्या सॅक्सन लोकांस नानाप्रकारें गांजीत व त्यांचा पदोपदी छळ करीत. ही स्थिति सुमारें शतसंवत्सर चालली. या अवधीच्या अखेरीस निकट सहवासानें, परस्परांत रोटीव्यवहार व बेटीव्यवहार होऊं लाग- ल्यानें व दीर्घ सान्निध्यामुळे एकमेकांविषयीं सहानुभूति उत्पन्न झाल्यानें नॉरमन् व सॅक्सन् लोकांचा एकजीव होऊन त्यां उभयतांपासून सांप्रतचे इंग्लिश लोक व इंग्लिश राज्यपद्धति निर्माण झाली. पानिपत (पान २८, ओळ २४. ): - हें अति पुरातन स्थळ आपल्या इतिहासांत सुप्रसिद्धं आहे. कौरवाशी संधि करण्याकरितां युधिष्ठिरानें जीं पांच प्रस्थे (गांव) मागितलीं त्यांपैकीं हें एक होतें. महाभारतांत वर्णिलेली कौरव पांडवाची समरभूमि - कुरुक्षेत्र- तेंच सांप्रतचे पानिपतचें मैदान होय. हें स्थळ दिल्लीच्या उत्तरेस ५३ मैलांवर पंजाब प्रांतांतील कर्णात जिल्ह्यांत आहे. अर्वा चीन इतिहासांत पानिपताजवळील अपरंपार मैदानांत तीन निकराच्या लढाया झाल्या; व त्यांत पराभूत झालेल्या पक्षाची राजसत्ता नष्ट झाली. पहिली लढाई इ० स० १५२६ या वर्षी इब्राहिम लोदी व पावर यांच्यामध्ये झाली. पुढें तीस वर्षांनीं इ० स० १५५६ त बावरचा नातू अकबर याने याच समरांगणांत हेमूचा पराभव करून थोड्या दिवसांपूर्वी हिरावून नेलेल्या बादशाहीचे पुनरुज्जीवन करून दृढ स्थापना केली. नंतर ता. १७ माहे जानेवारी सन १७६१ इ० रोज पानिपतच्या मैदानांत तिसरी घनघोर लढाई झाली. या प्रसंग अहमदशहा दुरा- णीनें महाराष्ट्र वीरांची वाताहत करून त्यांचा राज्यद्रुम तोडून टाकिला, आणि त्यामुळे इंग्लिश बादशाही स्थापन करण्याचा मार्ग सुगम झाला. सांप्रत हैं ठिकाण • नष्टवैभव झालेले आहे. O 27