या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० अकबर बादशहा. ब्राह्मणीराज्य ( पान ३०, ओळ १२. ) : - महंमदतघलख बादशहा दिल्लीच्या तक्तावर विराजमान असतां झापरखान नांवाच्या अफगाण सरदारानें दक्षिणेत एका स्वतंत्र राज्याची स्थापना केली. त्यासच ब्राह्मणी राज्य म्हणतात. झापर- खान हा पूर्वी गांगो नांवाच्या ज्योतिषी ब्राह्मणाजवळ गुलाम होता. त्याने यास फार ममतेनें वागवून तूं मोठा भाग्यशाली होशील असें भविष्य सांगितलें होतें. पुढे झापरखानाचे देव उघडून तो राजा बनला तेव्हां त्यानें आपल्या पूर्वीच्या धन्याविषयी कृतज्ञता दाखविणारें सुलतान अल्लाउद्दीन हसन गांगोब्राह्मणी असें आपणास नांव घेतलें. हें राज्य इ० स० १३४७ पासून तो १५२६ पर्यंत सुमारें १५० वर्षे चालू होतें, व या वंशांत एकंदर १८ राजे होऊन गेले. विजयनगरचे राज्य ( पान ३०, ओळ १२. ) : - त्राह्मणी राज्याप्रमाणेच महंमदतघलख याचे राजवड्यांत इ० स० १३३६ च्या सुमारास या राज्याची स्थापना झाली. सांप्रत ज्यास मद्रास इलाखा म्हणून म्हणतात त्याचाच या राज्यांत समावेश होत असे. विजापूर, अहंमदनगर, गोवळकोंडा, आणि बेदर येथील मुसलमान राजे एकत्र होऊन त्यांनी इ० स० १५६५ त तालीकोट येथील लढाईत रामराजाचा पराभव करून या राज्याचा नाश करून टाकिला. आग्रा (पान ३१, ओळ १४ ) :- हैं इतिहास प्रसिद्ध शहर उत्तर हिंदुस्था- नांत यमुना नदीचे तीरीं आहे. येथवर यमुना दक्षिण वाहिनी असून ह्या ठिकाणी तिचा ओघ पूर्वेकडे वळला आहे. या वळणामुळे जो कोन बनला त्यावर आग्र्याचा भव्य किल्ला उभा राहिलेला दिसतो. हा किल्ला अकबराचे राज्यांत बांधिला व त्याचे राजवव्यांत या शहराची थोरवी इतकी वाढली कीं तें मोंगल बादशाहीची राजधानी बनलें. शहाजहान बादशहाने येथे अनेक भव्य व रमणीय इमारती बांधवून या शहरास अपूर्व शोभा व अवर्णनीय वैभव आणिलें. मोति- मशीद, जुम्मामशीद, खास महाल, व ताजमहाल इत्यादि विशाल व मनोहर भुवनप्रासाद पाहून पथिक जनांची चित्तवृत्ति सोल्हासचकित होते. परंतु "यदृष्टं तन्नष्टं " या न्यायाने या नगरीचे पूर्व वैभव अवरंगझेबाचेच राजवच्यति नष्ट होण्यास प्रारंभ झाला. त्यानें दिल्ली येथें आपली राजधानी स्थापिली. सांप्रत या शहराचे वैभव अवशेष मात्र राहिलें आहे तरी त्या योगाने प्रेक्षक दंग होऊन जातो. दिल्ली (पान ३१, ओळ २३. ) : - यालाच प्राचीनकाळी इंद्रप्रस्थ असें म्हणत. सांप्रतचें दिल्ली हें नांव पहिल्या शतकांत या नगराला प्राप्त झालें असावें असा आधुनिक समज आहे. हॅ शहर यमुना नदीच्या उजव्या अंगास बसलें असून तिन्ही बाजूंनी दगडाच्या मजबूतशा परिकोटानें वेष्टिलेलें आहे. पूर्वेकडेस