या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिपा. २११ मात्र परिकोट नसून यमुनेचा जलाशय आहे. या परिकोटास दहा दरवाजे आहेत. मोंगल बादशहाच्या अमदानीत ही नगरी वैभवाच्या अत्युच्च शिखरास जाऊन पोहोंचलेली होती. कित्येक वर्षेपर्यंत ती मोंगलांची राजधानी होती. बादशाही अमलांत येथे अनेक भव्य व रमणीय इमारती बांधिल्या गेल्या. त्यांत बादशहाचा महाल, जुमामशीद, कुतुबमिनार इत्यादि स्थळे फारच प्रेक्षणीय होतीं. ती आतां शेषमात्र उरली आहेत तरी प्रेक्षकांना तटस्थ करून टाकितात. रणथंबोर (पान ३४, ओळ ९ ):-- हा इतिहास प्रसिद्ध किल्ला राजस्थानां- तील जयपूरच्या संस्थानांत आहे. हा किल्ला खडकावर बांधिलेला असून त्यास बुरुजनों व गोपुरांनी मजबुती आलेली आहे. अकबर बादशहाने हा हस्तगत करून मोगल बादशाहीस जोडिला होता, परंतु १७ व्या शतकांत त्या राज्यास उतरती कळा लागली तेव्हां जयपूरच्या राजानें तो आपले स्वाधीन करून घेतला व सांप्रत त्याचेंच त्यावर आधिपत्य आहे. ग्वालेर (पान ३४, ओळ २६. ) : - हें शिंदेसरकारच्या संस्थानाची राजधानी असून आग्र्याच्या दक्षिणेस ६५ मैलांवर आहे. येथे जैनधर्माच्या उपासनेचें पुरातन पीटस्थान आहे, एक प्रचंड व भव्य किल्ला आहे आणि हिंदुलोकांच्या कलाकौशल्याचीं साक्ष देणारों अनेक भुवनें व मंदिरे आहेत. या तीन गोष्टींमुळे या नगरीला प्रख्याति व थोरवी आलेली आहे. इ० स० १८५७ च्या बंडाचे प्रसंगी रावसाहेब पेशवे, तात्या टोपी, व झांशीची राणी लक्ष्मीबाईसाहेब यांनी हा किल्ला आपले स्वाधीन करून घेतला व आंतील सैन्य ही त्यांस अनुकूळ झालें होतें. परंतु खुद्द शिंदेसरकार व त्यांचे दिवाण सर राजेराव दिनकरराव यांनी आपली अलौ- किक स्वामिभक्ति यत्किंचितही ढळू न दिल्यानें बंडवाल्यांचे थोडक्याच काळांत निर्मूलन झालें. सांप्रत महाराज जयाजीराव शिंदे या संस्थानच्या गादीवर विराजमान आहेत. त्यांनां ब्रिटिशराज्यांत २१ तोफांच्या सलामीचा मान आहे. यांचें मूळचें निशाण भगवे असून त्यावर नागाची आकृति काढिलेली आहे. व त्यांत अलीकडे युनियन्ज्याक्- इंग्लिश बादशाहीचे निशाण ही मिसळलेलें आहे. काल्पी (पान ३५, ओळ २. ) : - हें लहानसे टुमदार शहर यमुना नदीच्या कोठी आहे. यमुना उत्तर-दक्षिण वाहिनी असून तिच्या पश्चिम किनाऱ्यावर काल्पीचा किल्ला बांधलेला आहे. त्यास तिन्ही बाजूंनी मोठा मजबूत कोट असून चवथे बाजूस यमुनेचा खोल प्रवाह आहे त्यामुळे हा किल्ला फार शोभिवंत व बळकट झाला आहे. किल्लयाच्या पश्चिमेस मैदान असून त्या पलीकडे शहर वसलें आहे. काल्पी येथे साखरेचा व्यापार फार मोठा चालत असल्यामुळे तेथे अनेक "व्यापा-यांच्या मोठमोठ्या हवेल्या पुष्कळ आहेत व रस्ते ही चांगले रुंद आहेत.