या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१२ अकबर बादशहा. हे शहर बादशहाचे वेळेपासून फार इतिहासप्रसिद्ध झाले आहे. येथें एक " चौन्याशी घुमटांचे मैदान " ह्मणून प्रसिद्ध रणभूमि आहे. तेथे बादशहाचे वेळी मोठी लढाई झाली होती. तीत बादशहाचे चौन्याशी नामांकित सर- दार पतन पावले व नंतर विजयश्री प्राप्त झाली ह्मणून बादशहानें त्या चौन्याशी - सरदारांच्या प्रेतावर चुनेगच्ची मजबूत व सुंदर कबरी बांधून त्यांचे चिर- स्मारक केलें आहे. ह्मणून त्यास " चौ-याशी घुमटांचे मैदान असें ह्मणतात. " इ० स० १८५७ त शिपायांच्या बंडामुळे उत्तर हिंदुस्थानांत धुमश्चक्री माजल्याने जी शहरें प्रख्यातीस आली त्यांतच या शहराची प्रमुखत्वें करून गणना केली पाहिजे. यासंबंधी व बंडाच्या वृत्तांताची खुलासेवार माहिती पाहिजे असल्यास पारस- नीसकृत झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचें चरित्र पहावें अशी आमची शिफारस आहे. त्यांतूनच वरील उतारा घेतला आहे. फत्तेपुरशिकी (पान ३५, ओळ ९. ): हें शहर अकबरानें इ०स० १५७० यांत वसविलें. सांप्रत है आप्रा जिल्ह्यांत तहसिलीचें ठाणें आहे. कुराण (पान ३५, ओळ १७ ): --- मुसलमान लोकांचें धर्मपुस्तक. याचा शब्दशः अर्थ वाचनीय अथवा वाचनाई असा आहे. ह्मणून महमद पेगमवर यानें प्रतिपादिलेल्या हरएक धर्मवचनाला कुराण असें ह्मणत. पुढे या शब्दाचा अर्थ विस्तृत होऊन धार्मिक, व्यवहारिक, सामाजिक, व्यापारसंबंधी व लष्करी कायदा- कानूंच्या संग्रहाला कुराण ही संज्ञा प्राप्त झाली. मुसलमानी धर्माप्रमाणे कुराण हें अप असून अनादि आहे. तें अरवी भाषेत गद्यरूपानें लिहिलेले आहे. त्याची भाषा अगदी शुद्ध व प्रौढ आहे. परमेश्वर एक आहे व त्याने प्रतिपादि- लेला सत्यधर्म एकच आहे, असें कुराणांत वर्णिले आहे. पुण्याचरणानें प्राप्त होणारी सुखे व पापमूलक दुःखें यांचे ही त्यांत सविस्तर विवेचन असून बायबलां- तील दृष्टांत घेऊन तीं परिस्फुट करून दाखविलीं आहेत. या शिवाय त्यांत आदिपुरुषांच्या चरित्रांचा समावेश झाला असल्यामुळे कुराण ग्रंथ फारच विस्तृत व मनोरंजक झालेला भाहे. राजपुताना (पान ३६, ओळ १२. ): - या नांवाखाली मोढणारीं वीस संस्थानें असून शिवाय कांहीं इंग्लिश सरकाराचाही मुलुख आहे. यांत अंतर्भूत होणारीं संस्थानें आहेत तीं येणें प्रमाणें. ( १ ) जैसलमेर ( २ ) मारवाड किंवा जोधपूर ( ३ ) आणि विकानेर हीं पश्चिम व उत्तर बाजूस आहेत. ईशान्येस ( ४ ) अलवाढ व ( ५ ) शेस्वाद्दी ( ६ ) जेपूर ( ७ ) भरतपूर ( ८ ) ढोलपूर ( ९ ) करोळी (१०) बुंदी ( ११ ) कोठा ( १२ ) झालावाड ही पूर्वेस व आग्नेयीचे बाजूनें आहेत. नैर्ऋत्येस (१३) प्रतापगढ (१४) बनस्वादा (१५)