या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ अकबर बादशहा. परिकोट आहे. येथें ओसवाल व पालीवाल व्यापान्यांची वस्ती असून ते श्रीमान आहेत. हे जैन धर्मानुयायी असल्यामुळे या पंथाचें तेथें एक पुरातन देवालय आहे. 'अमरकोट ( पान ४६, ओळ ९. ):- हैं शहर सिंध प्रांतांत आहे. उमर नांवाच्या एका मुसलमान सरदारानें तें वसविलें म्हणून त्यास उमरकोट असें नांव दिलें. अमरकोट हा त्याचा मराठी अपभ्रंश असावा. अकबरची जन्मभूमि म्हणून इतिहासांत याला महत्व आले आहे. येथें एक मोठा जबरदस्त किल्ला होता. त्यांतच हल्ली सर्व कचेऱ्या आहेत. कलिंजर (पान ५४, ओळ १४. ): - हा भव्य व जुनाट डोंगरी किल्ला बुंदेलखंडांत आहे. यास सात दरवाजे आहेत. सत्ययुगांत त्यास रत्नकूट हैं नांव होते; त्रेतायुगांत त्यास महागिरी म्हणूं लागले; व द्वापारांत त्यास पिंगलू ही संज्ञा मिळाली. फार प्राचीन काळापासून याची पुण्यस्थळांत गणना आहे. याच्याजवळपास अनेक सरोवरें, गुहा, देवालयें व समाधी आहेत. या ठिकाणीं मृगधारा नांवांचे एक जलाशय आहे. हल्ली हा किल्ला उध्वस्त झालेला आहे. लाहोर (पाने ५६, ओळ ४. ): - प्रख्यात सूर्यवंशीय दाशरथी रामाचा मुलगा लहू यानें या शहराची स्थापना केली अशी लोककथा आहे. मोंगल बादशाहत हैं शहर वैभवाच्या व भरभराटीच्या उच्च शिखरास जाऊन पोहों- चलें होतें. शिवालिख (पान ५६, ओळ २१.) : - ही पर्वतावली वायव्येकडील प्रांतांत देहरादुन जिल्ह्यांत आहे. ती हिमालय पर्वताला हरिद्वारापासून तो बियास नदी- पर्यंत समांतर आहे. या पर्वताच्या खालच्या बाजूस साल व सैन यांचे दाट जंगल माजले असून वरच्या बाजूस देवद्वार वृक्षांची गर्दी झालेली आहे. या पर्वतश्रेणीत, वाघ, विवट, चित्ते, तरस, हत्ती व चितळ यांचे मोठमोठे कळप आहेत. शिया व सुन्नी (पान ६२, ओळ ५. ) :- हे मुसलमान धर्मात दोन पंथ आहेत. शिया या शब्दाचा अक्षरश: अर्थ पक्ष असा आहे. शिया हे महंमद पेगमबरचा जांवई जो अल्ली त्याचे अनुयायी. यांचीं मतें, आचार, विचार व धर्मसंस्कार हीं सुन्नी सांप्रदायाहून अगदी भिन्न आहेत. सुन्नी लोक अल्लीस मानीत नाहींत असें नाहीं पण ते अबुबकर उस्मान आणि उमर या दोन खलीपांसही पूज्य मानतात. मोंगल, थोडे आरव व हिंदुस्थानांतील खोजे व चोहोरी है. बहुतेक शिया आहेत. अफगाण, तुर्क वगैरे बाकीचे मुसलमान सुन्नी सांप्रदायांत