या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीपा. २१५ मोडतात. सुन्नी याचा शब्दार्थ श्रुति असा आहे. मुसलमान धर्मात श्रुतीप्रमाणे 'ज्यांचे वर्तन त्यांना सुन्नी असें म्हणतात, यांच्या मतें शिया हे काफर होत. या दोन्ही पंथांत भिन्न मतामुळे प्राचीन काळापासून मोठाच विरोध माजलेला आहे. मोहरमच्या सणांत शिया ठोक बहुतेक दुःखांत मशिदीत घालवितात व सुन्नी लोकांचा धांगडधिंगा त्यांस मुळींच पसंत पडत नाहीं. ओरिसा ( पान ६६, ओळ १९. ) : – बंगाल इलाख्याच्या नैऋत्येकडील प्रदेश. याचे स्वभावतःच दोन विभाग झालेले आहेत. महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या नद्यांच्या चिमट्यांतील भाग सुपीक असून बाकीचा भाग निर्जन व ओसाड आहे. या प्रांतांत जगन्नाथाचें देवालय असल्यामुळे त्यास पुण्यभूमित्व प्राप्त झाले आहे. यालाच स्वर्गद्वार असें म्हणतात. महाराष्ट्रीयांना जशी पंढरी, दाक्षिणात्यांना जशी त्रिपथी, तशी वंगदेशीय व उत्तर हिंदुस्थानातील जनांना जगन्नाथपुरी होय. याच प्रांतांत कबीर व चैतन्य इत्यादि परमहंस साधु व धर्म- संस्थापक उदयास आले. जगन्नाथाच्या रथोत्सवाकरितां दरसाल हजारों भावि कलोकांच्या झुंडीच्या झुंडी जातात. परंतु त्यांपैकी अनेक जन अकालीच मृत्यु- मुखीं पढतात. याच प्रतिति विख्यात चिलका सरोवर आहे. माळवा (पान ६७, ओळ ५. ): - हा प्रांत मध्यहिंदुस्थानांत असून फारच सुपीक आहे. यांत पुढील संस्थानें मोढतात.: -इंदूर, भोपाळ, धार, रतलाम, जावरा, राजगढ, नरसिंगगढ. प्रागैतिहासकालीं या प्रांताची राजधानी प्रख्यात उज्जयिनी नगरी होती. विक्रमशकाचा कर्ता प्रसिद्ध विक्रमादित्य राजा येथेंच राज्य करीत होता. या शकाला संवत् असें ह्यणतात व तो नर्मदेच्या दक्षिणेस चालतो. याची स्थापना इ० सनापूर्वी ५७ वे वर्षों झाली. त्या प्रांतात अफु फारच पिकते व त्यामुळेच त्याला सांप्रत प्रसिद्धि आलेली आहे. जयपूर (पान ६७, ओळ १८ . ) : - राजपुतान्यांत जीं अनेक संस्थाने आहेत त्यांत हे ठळक व प्रख्यात आहे. या संस्थानाची स्थापना इ० स० ९६७ त झोलराव नांवाच्या राजानें केली. येथील राजे आपण, रघुवंशांतील आहोंत असें समजतात. अकबरच्या राज्यांत या संस्थानाचें महात्म फारच वाढले होते. तेवेळीं भगवानदास हा गादीवर असून त्यानें आपली मुलगी शहाजादा सलीम यास लग्नांत दिली होती. इ० स० १८५७ सालीं जें बंढ झाले ते वेळी या संस्थानाने ब्रिटिशतरकारास उत्तम प्रकारची मदत केली. त्यामुळे त्यास दत्तकाची परवानगी मिळालेली आहे. हल्लीं गादीवर कैमसिंग महाराज आहेत. त्यांस. २१ तोफांच्या सलामीचा मान आहे. प्रख्यात सांभर सरोवराचा बरा- ● चसा भाग या संस्थानांत असून बाकी राहिलेला भाग जोधपूरांत गेलेला आहे.