या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ अकबर बादशहा. विस्तीर्ण सरोवर वीस मैल लांब, तीनपासून दहा मैल रुंद व एक ते चार फूट खोल आहे. यांत प्रतिवर्षी सुमारें चार कोटी मण मीठ उत्पन्न होतें. इ० स० १८७० पर्यंत ही प्राप्तीची बाब त्या त्या संस्थानाकडे होती. परंतु १८७० सालीं नवीन तह ठरून इंग्रज सरकार या मिठाच्या कारखान्याचे कौल मक्तेदार बनले आहे. जोधपूर (पान ६७, ओळ २३. ): - यालाच मारवाढ असें ही ह्मणतात. हें संस्थान राजपुतान्यांत आहे. जोधराव नांवाच्या राण्याने याची स्थापना केली ह्मणून त्यास जोधपूर असें ह्यणतात. येथील राणे राठोर घराण्यापैकी असून ते आपणांस सूर्यवंशीय ह्मणवितात. या संस्थानांत मूळचे रहिवाशी, चारण, भाट, जाट, मिना व भिल्ल इत्यादि आहेत. हें संस्थान मारवाड्यांचे आगर आहे. हे लोक उद्योगधंद्याकरितां जरी सर्व हिंदुस्थानभर पसरले आहेत तरी त्यांच्या अंतःकरणांत स्वराजनिष्टा सदैव जागृत असते. अकबरच्या राजवट्यांत राणा उदेसिंग यानें ही मोंगल बादशहाशी शरीरसंबंध जोढिला होता. यामुळे वाद- शहाची मर्जी त्यावर सुप्रसन्न असे. विकानेर (पान ६८, ओळ २ ):- मारवाडचा राजा जोधराव याचा सहावा मुलगा विक यानें इ० स० १४३८ त हैं संस्थान स्थापिलें. ह्मणून त्यास हे नांव दिलें. याचा राजपुतान्यांत समावेश झालेला आहे. या प्रदेशांत नदी नाले 1 मुळींच नाहींत. येथे उन्हाचा व थंडीचा अतिरेक असल्यामुळे दोन्ही ऋतूंत येथील मुख्य धान्य बाजरी असून कलिंगडे व काकड्या तेथे विपुल पिकतात. गाई, म्हशी, बैल वगैरे जनावरें या प्रदेशांत उत्तम प्रकारच होतात. येथील घोडे मजबूत व राकट असतात. या संस्थानचे अधिपति रजपूत वंशांतील राठोड जातीचे आहेत. सांप्रतचे महाराज दत्तक पुत्र आहेत. लोकांचे हाल होतात. मेवात (पान ६८, ओळ ५. ): - हा प्रांत आतां इतिहासांत मात्र राहिला आहे. तो दिल्लीच्या दक्षिणेस होता. हल्लीचा मथुरा जिल्हा, गुरगांव, अलवा- ढचा बराचसा भाग व भरतपूरचा कांहीं भाग यांचा या प्रदेशांत समावेश होत असे. येथील लोकांना मेओ ह्मणतात. आपण रजपुतांचे वंशज आहोत असे ते समजतात. परंतु वास्तविकपणें पाहिलें असता त्यांची जात विविध असावी. यांचे आचारविचार कांहीं अंशी हिंदूप्रमाणें व कांहीअंशी मुसलमानांप्रमाणे आहेत. यांच्यांत सुंता, निका व मृतांस पुरण्याची वहिवाट आहे. दिवाळी व होळी हे सण ते करितात. सगोत्रांत विवाह करीत नाहींत. पाशधर्म ( पान ७७, ओळ १४ ): - याचा संस्थापक झोरोस्टर नांवाचा पुरुष होऊन गेला. या धर्मातील प्रयास झेंढावेस्टा असें नांव आहे.