या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीपा. २१७ पार्शीलोक आपल्या देवाला ओरमज्द अथवा अहुरमज्द असें म्हणतात. हे लोक सूर्योपासक आहेत. अग्नि हा सूर्याचाच अंश असल्यामुळे त्याचीही ते उपासना करितात. चौगन (पान ९८, ओळ २ ): - ( आधुनिक पोलो ) - हा खेळ फार श्रमाचा, चालाखीचा व धोक्याचा आहे. तो घोड्यावर बसून कुबडीप्रमाणें टोंकें वांकविलेल्या लांब काठ्यांनी खेळतात. या करितां सपाटीची जागा मुद्दाम साफ करून ठेवावी लागते; व तिच्या दोन्ही बाजूंनीं चिचोळी वाट केलेली असते. प्रत्येक बाजूला चार चार इसमाची टोळी घोड्यावर स्वार होऊन खेळण्यास उभी राहते. सपाटीच्या मध्यभागी चेंडू ठेविला असतो व तो वांकविलेल्या टोकांनीं आपले बाजूच्या वाटेंतून पार घेऊन जाण्यास प्रत्येक टोळी खटपट करिते. व ज्यांना ती साधते त्यांनी खेळ जिंकिला असें समजतात. ओगी (पान ९९, ओळ ११. ) : – हा योगी शब्दाचा अपभ्रंश होय. योग्याची व्याख्या भगवद्गीतेंत दिली आहे ती अशी:- आत्मीपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ॥ सुखं वा यदिवा दुःखं स योगी परमोमतः ॥ जोगी हे शैव सांप्रदायाचे असून त्यांना कानफाटे असें नांव आहे. ते गोरखनाथाचे शिष्य होत. वास्तविक पाहिलें असतां यांनी आपले आयुष्य परमेश्वराचे चिंतनांत घालवावयाचें, परंतु सांप्रत ते आपल्या मूळच्या वृत्तीपासून पराङ्मुख होऊन संसारी लोकांपेक्षाही अधिक भोगी झाले आहेत. संन्यासी (पान ९९, ओळ ११. ) : - ' ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टिन कांक्षति.' ह्मणजे ज्याला द्वेष नाहीं व आवड नाहीं तो संन्यासी जाणावा. आश्रमचतुष्टयांतील चवथ्या आश्रमाला संन्यास अशी संज्ञा आहे व तो धारण करणारा संन्यासी होय. पहिल्या तीन आश्रमांना, ब्रह्मचर्य, गार्हस्थ्य आणि वानप्रस्थ्य अशीं नांवें आहेत. काशीस संन्याशांचा भरणा फार असून ते आपल्या आश्रमानुरूप न वागता व्याज बट्ट्याचा रोजगार करितात असें ह्मणतात. धर्मयुद्ध (पान १११, ओळ १ ): - मुळांत या ठिकाणीं शिव्हलरी (chivalry ) शब्दाची योजना केलेली आहे. त्याचा अर्थ धर्मयुद्धापेक्षां जास्त व्यापक आहे. बाराव्या व तेराव्या शतकांत शिव्हलरी नांवाची एक संस्था सर्व युरोपभर वरिष्ठ स्थितींतील लोकांत प्रचलित होती. तिच मुख्य तत्वें चार होती. ती अशी (१) स्त्रीजनाविषयीं अत्यादर व स्वतः जी निवडली असेल ती देवतेप्रमार्णे मानून तिजला सर्वस्व अर्पण करणें, (२) दुर्बळाविषय 28