या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ अकबर बादशहा. कळवळा व त्यांना मदत करण्याची उत्कट इच्छा; व (३) युद्धांत शत्रूश निष्कपटाने व नीतीनें संग्राम करण्याची बुद्धि ( ४ ) धर्म आणि सत्य व स्वतःचा मान यांसाठीं सदा मरण्यास तयार असणें. भारतीय युद्धाचा इतिहास पाहिला असतां हीं चारी तत्वें पृथकत्वाने ते वेळीं मान्य होतीं असें आढळून येईल. रसगंगाधरीत युद्धवीरता ह्मणून जी वर्णिलेली आहे तीच शिव्हलरी होय असें वाटतें. तोडरमल (पान ११२, ओळ ४. ) : - हा क्षत्रिय होता. अलीकडील शोधा- वरून त्याची जन्मभूमी अयोध्या प्रांतांत लाहोरपूर गांवों आहे असें कळतें. इ. स. १५६४ त त्यानें अकबराच्या दरबारांत लहानशी नोकरी पतकरली व दहा वर्षांच्या अवकाशांत आपल्या नैसर्गिक गुणांच्या प्रभावानें तो मोठ्या हुद्याच्या दर्जास जाऊन पोहोंचला. अकबरानें गुजराथ प्रांत सर केल्यावर तेथील वसु- लाची व्यवस्था लावण्याचें काम तोडरमलाकडे सोपविलें (१५७४ ). त्याची विशाल बुद्धिमत्ता, निःसीम कार्यभक्ति, व सत्यैकनिष्ठा यांमुळे अकबर प्रसन्न झाला व त्यानें त्यास आपल्या संपूर्ण बादशाहीचा दिवाण नेमिलें. ( १५८३ ). तेव्हां तोडरमल्लानें जमीनीवरील धान्यासंबंधी व वसुलाच्या बाबीसंबंधीं पूर्वीच्या वहिवाटीत अनेक फेरफार करून सुधारणा केल्या. त्यांत मुख्य ही होती कीं हा कालपर्यंत सर्व हिशेबी काम हिंदी भाषेत चालत असे. तें त्यानें बंद करून इतउत्तर सर्व हिशेब फारशी भाषेत लिहिले पाहिजेत असा हुकूम फरमाविला. या गोष्टीमुळे हिंदू लोकांना दरबारांतील भाषेचा -फारशीचा अभ्यास करणें जरूर पढलें. राजा तोडरमल लेखणीचा मजबूत व हिशेबाचे कामांत फर्डा होता इतकेंच नाहीं तर समरांगणांतही तो पहिल्या प्रतीचा तरवार बहाद्दर होता. युसफझै लोकांनीं बिरबलाचा वध केला तेव्हां बादशहाने त्यांच्या मोहिमेवर राजा मानसिंगांस रवाना करून समागमें राजा तोडरमल यासही पाठविलें.. याशिवाय दुसऱ्या कित्येक लढाईत त्यानें आपलें बाहुवीर्य प्रगट केलेले आहे. तो जसा पराक्रमी होता तसाच निग्रही व कर्मठही होता. मरण समय तो चार- हजारी म्हणजे चार हजार सैन्याचा अधिपति झाला होता. राजा बिरवल (पान १२८, ओळ १६. ): - हा जातीचा ब्राह्मण असून याचें मूळचें नांव महेशदास असें होतें. त्याची स्थिति फार गरीबीची असल्या- मुळे बंदीजन वृत्तीनें तो आपली उपजीविका चालवी परंतु जात्या बुद्धिवान व विचक्षण असल्यामुळे अकबराच्या दरबारांत प्रवेश झाल्यावर लवकरच त्याचें तेज पडूं लागलें. त्याचें भाषण समयोचित व सुभाषितांनीं प्रचुर असल्याने थोडक्याच काळांत दरबारांत त्याची चहा होऊं लागली. त्यानें हिंदी भाषेत रचलेली