या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीपा. २१९ काव्यें अत्यंत सुरस व आल्हादकारक आहेत. त्याच्या कवित्वगुणास लुब्ध होऊन बादशहाने त्यास कविराज अशी पदवी देऊन त्यास आपल्या समागमांत ठेविलें. इतर राजांशी बोलणें लाविण्यास अकबर त्याची योजना करीत असे. तो बहुधा दरबारांतच राही. परंतु इ. स. १५९० त युसफझे लोकांवर जी मोहीम रवाना केली तिच्या कुमके करितां म्हणून मागाहून रवाना केलेल्या सैन्याबरोबर बिरबलासही पाठविलें होतें. ही मोहीम सर्वस्वी अपयशस्वी होऊन तींत बिरबलाचा अंत झाला. त्याच्या मृत्यूमुळे बादशहा शोकाकुल झाला; कारण बिरबलावर त्याचें प्रेम फार होतें. बदौनी, शावासखान वगैरे हटवादी मुसलमान लोक बिरबलाचा द्वेष करीत. कारण, त्यांचा असा ग्रह झाला होता की त्यानें बादशहास महमुदीय धर्मापासून पराङ्मुख केलें. तो गायनकलेत अत्यंत निपुण होता. दानशूरतेबद्दलही त्याची कीर्ति आहे. ओरच्छा येथील राजा (पान १३६, ओळ २. ) : - याचें नांव बिरसिंग- देव असें होतें. यानें " आपल्या कारकीर्दीत झांशी येथे प्रचंड किल्ला बांधून त्यास चांगले स्वरूप आणिलें. बिरसिंगदेव हा मोठा क्रूरकर्मा होता. त्यानें १६०२ ह्यावर्षी दिल्लीपति अकबर बादशाहाच्या अति मर्जीतला मुत्सद्दी व इतिहासकार अबुल फजल ह्यास ठार मारिलें. त्यावरून अकबर बादशहास त्याचा मनस्वी राग आला, व त्यानें त्याचें पारिपत्य करण्याकरितां आपला मुलगा सेलिम ह्यास फौज देऊन बुंदेलखंडांत पाठविलें. तेव्हां विरसिंगदेव भिऊन कोठें पळून गेला. हाच सेलिम पुढे तीन वर्षांनी, ह्मणजे इ. स. १६०५ यावर्षी दिल्लीच्या गादीवर बसला. जहांगीर ह्मणून पुढे जो सुप्रसिद्ध बादशहा उदयास आला तोच हा. त्याची बिरसिंगावर पुनः मेहेरवानगी होऊन त्यानें त्यास अपराधाची क्षमा करून झांशी प्रांत परत दिला. " – ( महाराणी लक्ष्मीबाई यांचें चरित्र. ) आईन-ए-अकबरी (पान १४२, ओळ ५. ):- सुप्रसिद्ध इतिहासकार .शेख अबुल फझल यानें अकबर बादशहाचे राज्याचा सविस्तर इतिहास लिहिला आहे. त्याचें नांव अकबरनामा. या ग्रंथांतील तिसऱ्या पुस्तकाला आईन-ए- अकबरी असें म्हणतात. आईन ह्मणजे राज्य-पद्धति. या पुस्तकांत अकबराची राज्यपद्धति खुलासेवार वर्णिलेली आहे. या पुस्तकाचे एकंदर पांच भाग आहेत. प्रोफेसर ब्लॉकमन यांनी याचे इंग्रजीत भाषांतर केलें आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत या संबंधी लिहिलें आहे तें असें :- आईन दें अकबराच्या राज्यकार भाराचे चित्र होय. राज्यांतील निरनिराळीं खातीं, व त्यांचा परस्पराशीं अस- लेला संबंध; दरबारांतील व खानगी कढील व्यवस्था; पदरी असलेल्या वीर