या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२० अकबर बादशहा. पुरुषांचीं, कवींचीं, इतर गुणिजनांची व राजकारणी मुत्सद्यांचीं चरित्रे; न्याय खात्याची, वसुलाची व मुलकी कडील कामाची व्यवस्था व कायदे कानू ; जमी- नीची मोजणी व त्यावर धारा वसविण्याची तत्वें ; एकंदर राज्याची जमाबंदी व राजा तोडरमल याने ठरवून दिलेली वसुलाची पद्धति ; जनतेची स्थिति व रीति- रिवाज, साहित्यशास्त्रादिकलेचा प्रसार, धर्म व षडदर्शनादि तत्वज्ञानांचा विचार, इत्यादि गोष्टींची परिपूर्ण माहिती या पुस्तकांत संग्रहीत केलेली आहे. यापूर्वी मुसलमान लोकांनी लिहिलेले इतिहास ह्मणजे राज्यांतील अगणित घडामोडींची व लढायांचीच फक्त टिपणें होत. त्यांत व्यवहारिक व सामाजिक गोष्टींचा उल्लेख ह्मणून नाहीं. परंतु आईन-ए-अकबरीत मात्र राज्यांतील निरनिराळे लोक, तत्कालीन विचारणीय गोष्टी, जनतेचे समज, त्या वेळची तत्वें व आचार- विचार यांचे चित्र हुबेहूब व चटकदार असें उठवून दिलेले आढळते. यावरून हैं पुस्तक हिंदुस्थानांतील पूर्वीच्या सर्व इतिहास ग्रंथांत केवळ अपूर्व असून इति- हास या संज्ञेस सर्वतोपरी पात्र आहे. लेब्यानॉन (पान १४९, ओळ २२. ) : – एशियाखंडाचे पश्चिमबाजूस सिरिया प्रदेशांत हा पर्वत आहे. वर्षातून सहा महिने याचीं शिखरें बर्फाच्छादीत असतात. याच पर्वतांत जोरडन नदीचा उगम आहे. या पर्वताच्या श्रेणी अगर्दी शांत व निर्जन आहेत. तेथे अनेक मठ आहेत. व श्रांत झालेल्या पथिक जनांस तेवढीच कायती आरामाची जागा आहे. चोहोकडे शांतता अस- ल्यामुळे हे स्थळ परमेश्वराचें चिंतन करण्याला फारच योग्य असें आहे. लामा पान १४९, ओळ २३. ):- तिबेट व मंगोलिया येथील धर्मगुरूस लामा असें म्हणतात. यांचा धर्म बुद्धधर्मासारखाच आहे. यांतील धर्मपुस्तकाला कंजर असें ह्मणतात. त्याचे सात भाग आहेत. दावेस्ता (पान १४९, ओळ २५. ) : - पारशी लोकांचे धर्मपुस्तक. जेसुइट (पान १५८, ओळ २१ ): - रोमन क्याथोलिक धर्मात हा एक धर्मगुरूंचा पंथ आहे. याची स्थापना इ. स. १५३४ त झाली. या पंथाची मुख्य तत्वें पवित्राचरण, निर्धनता, व आज्ञानुवर्तन हीं होत. लष्करी खात्याप्रमाणें या पंथांत व्यवस्था आहे. वरिष्ठ सांगेल तें सर्वास वंद्य करावें लागतें. कसेही कोणाचें खाजगी उत्पन्न म्हणून नाहीं. या पंथांतील स्त्रिया व पुरुष अविवाहित अस- तात. हा पंथ स्थापन करण्याचा उद्देश युरोपांत धर्मक्रांति होऊन नवीन निघालेल्या प्रॉटेस्टंट पंथाचा नाश करून क्याथोलिक धर्माची उन्नती करावी हा होता. जेसुइट लोकांनी याबद्दल अतोनात खटपट करून बरेंच यश मिळविलें. परंतु तसे करण्यांत त्यांनी महान् पातकें केलीं. त्यांचें मत असें असे व आहे. क