या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टीपा. २२१ साधावयाचा हेतु जर चांगला असला तर वाटेल ते उपाय योजावेत. यामुळे व ह्यांच्या राज्यकारभारांतील ढवळाढवळीमुळे यांचा लोकांस अतीच तिटकारा आला. सध्यां जेसुइट लोक राज्यकारभारांत मुळींच पडत नाहींत. फक्त विद्यादान व ख्रिस्ती धर्माचा प्रसार यांकडेसच त्यांचे लक्ष आहे. यामुळे हा पंथ पुनः अभ्युदयास आलेला आहे. हिंदुस्थानांत पहिला मोठा जेसुइट आला तो फॅन्सिस झेविअर. त्यांनें व त्याच्या अनुयायांनी हजारों हिंदूंस वळजवरीनें ख्रिस्ती केलें, तेच आपले " गोव्याचे किरस्तांव." प्यारिसीझ (पान १८९, ओळ २६. ): - ज्यु लोकांपैकी एका पंथांतील लोकांचें हें नांव आहे. हे लोक ईश्वर उपासनेचा पोकळ ढौल घालीत. अंत:- करणांत भक्ति तिळमात्र नसून बाहेरील डामडौल दाखविण्यांत हे फार पटाईत होते. अंतर्गत भाव लक्षांत न आणितां केवळ शब्दानुरूप वागण्याकडे यांची प्रवृत्ति फार असे. इलिझाबेथराणी (पान २००, ओळ १८ . ) : - ही आठव्या हेन्रीची मुलगी. इचा जन्म इ. स. १५३३ त होऊन ती इ. स. १५५८ त गादीवर विराजमान झाली. ही फार तेजस्वीनी होती. तिचा दरारा कांहीं विलक्षण असे. इच्या राजवय्यांत इंग्लिश राज्याच्या व इंग्लिश लोकांच्या उत्कर्षास सुरवात झाली. इंग्लडचा कट्टा शत्रू स्पेनदेश, त्याचा पराभव होऊन राज्यांत चोहोंकडे शांतता नांदू लागली. इंग्लिश राज्यास संमत जो राजाश्रित एपिस्कोपल धर्म तो हिने स्थापन केला व क्यथोलिक धर्माच्या पुनरुजीवनाच्या आशांचा लव- देशही तिनें उरूं दिला नाहीं. कविशिरोमणी शेक्स्पीअर व स्पेन्सर आणि प्रसिद्ध तत्ववेत्ता बेकन यांचा उदय याच काळ झाला. तेव्हां हा काल इंग्लंडला सर्वस्वी वैभवशालीच समजला पाहिजे. हिचे राज्यांत इंग्लंडचा परराष्ट्रांशी व्यापार वाढला व इंग्लंडच्या वसाहतींस व परमुलखांच्या विजयास आरंभ झाला. पुढे नांवारूपास चढून हिंदुस्थानांत सार्वभौम पद पावलेली ईस्ट इंडिया कंपनी याच वेळेस उदयास आली. पार्लमेंटचें माहात्म्य वाढून प्रजाजन आपआपल्या हक्कांचा उपभोग वाढत्या प्रमाणावर घेऊ लागला. या सर्व गोष्टी एलिझाबेथनें आपल्या मुत्सद्दीपणाचे जोरावर घडवून आणिल्या. म्हणून इंग्लंडच्या तक्तावर जे राजे बसले त्यांत बहुतेक अग्रस्थानीं हिची गणना करतात. फ्रान्सचा चवथा हेन्री (पान २००, ओळ १८. ) : - याला "मोठा" व " चांगला " अर्शी टोपण नांवें होतीं. याचा जन्म इ. स. १५५३ त झाला त्या वेळीं फ्रान्स देशांस प्रॉटेस्टंट व क्यॅथोलिक या दोन पक्षांत मोठा रणकल्होळ - चालून अतोनात रक्तपात होत होता. हेन्री प्रॉटेस्टंट होता झणून त्यास