या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अकबर बादशहा. गादीवर बसूं देऊं नये अशी मोठी खटपट झाली. ती त्याने बाहुबलानें मोडली. १५८९ मध्ये गादीवर बसल्यावर त्यानें क्यॅथोलिक धर्म स्वीकारला. तथापि गृहकलह शमविण्यासाठीं त्यानें राजशासन काढून प्रॉटेस्टंट पंथांतील लोकांना आपल्या मनोदेवतेनुरूप वागण्याची पूर्ण मुभा दिली. हें शासन 'एडिक्ट ऑफ- न्यांटिस' या नांवानें प्रसिद्ध आहे. याच्या आमदानीत राज्यांतील दंगेधोपे नाहींसे झाल्यानें त्यानें आपले लक्ष अंतर्गत व्यवस्थेकडे लाविलें. पूर्वी. होऊन गेलेल्या राजांनी अनुदार व संकुचित असें राज्यधोरण चालविल्यानें अधिकारी मंडळी कह्याबाहेर गेली होती. ते प्रजाजनांना नानातऱ्हेनें पीडा करीत व त्यांजवर नवेनवे कर बसवून त्यांना गांजीत ; व बिगारीच्या बाबतीत ही त्यांचा छल करीत. हेन्रीनें हे सर्व दुराचार बंद केले. याच्या राजवय्यांत देशांत रस्ते व कालवे होऊन व्यापार उदीमाची वृद्धि झाली. त्याने वसुलाच्या बाबतीत फेरफार करून त्यावेळचा प्रसिद्ध मुत्सद्दी सली याच्या सल्ल्यानें जमाबंदीच्या पद्धतीत सुधारणा केली. जशी एलिझाबेथच्या राजवड्यांत इंग्लंडच्या अभ्युदयास, तशीच हेन्रीचे राज्यांत फ्रान्स देशाचे अभ्युदयास सुरवात झाली. अकबरानें ही असाच मुत्सद्दीपणा व पराक्रम दाखविला असें ग्रंथकर्ता म्हणतो तें यथार्थच आहे. दर केल