या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६
अकबर बादशहा.

करावी. हिंवाळा अगदी जवळ येऊन ठेपला होता; त्यामुळे नाखुष असतां ही, बाबर हा हिरात येथें या सामायिक सुलतानांचा पाहुणचार घेण्यासाठी गेला. या राजधानीर्चे वैभव वर्णन करण्यास बाबरनें आपलें वृत्त स्वतः लिहून ठेविलेल्या बखरीचीं वीस पार्ने दिली आहेत. तो बीस दिवस, प्रत्येक दिवशीं नवीन नवीन स्थळे पाहत होता. व दिसें- बरची २४ वी तारीख निघून गेल्यावर त्याने आपल्या घराकडे परत जाण्याचा विचार केला.
 हिराताहून बाबराच्या राजधानीस पोहचण्यास उन्हाळ्यांत २० दिवस लागत. परंतु हिंवाळ्यांत हा प्रवास किती संकटाचा, कसोटी पाहणारा, त्रासदायक व बहुतेक पार न पडण्यासारखाच आहे याचा प्रत्यक्ष अनुभव १८७९-८१ सालांतील अफगणिस्थानावर केलेल्या मोहिमेंत कढत असलेल्या ब्रिटिश सरकारच्या सेनेस पूर्णपर्णे आला आहे. त्याची कल्पना अनुभवाशिवाय होणें नाहीं. तो पर्वतांतील रस्ता उन्हाळ्यांत फारसा कठीण नसतो; पण ऐन हिंवाळ्यांत तो परीक्षाच पाहतो. अशा रस्त्यानें, चोहोंकडून बर्फ पडतच आहे, अशा स्थितीत बावर हा आपल्या राजधानीकडे वळला. तो स्वतः वाट दाखविण्यास पुढे सरसावे व कल्पितां येत नाहींत असे परिश्रम करी. शेवटीं थकून भागून व निराशेनें वाटेल ते करण्यास तयार असा आपल्या सेनेसह कसाबसा झिरिन घाटावरून रस्ता जात होता त्याचे पायथ्याशी येऊन पोहोचला. तेथून पुढे जाण्याची आशाच दिसेना. वादळ सोसा- ट्याने वाहत होतें व बर्फाचे खोलखोल थर चोहोकडे पडले होते. खिंडीतला रस्ता इतका निरुंद होता कीं एका मनुष्यास मात्र त्यावरून जातां येई. तथापि, बाबर तसाच नेटाने पुढे चालला.रात्र पडली. तेव्हां थोड्याश्या लोकांसच आश्रय देईल अशा एका गुहेपाशीं तो आला. मनाचा अत्युदार, हा वाबरमध्ये मोठा अलौकिक गुण होता;त्यास अनुसरून त्यानें आपल्या सैनिकांस त्या गुहेंत निवाऱ्यासाठीं