या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ही शांत झालें. भाग ३ रा. १७ जाण्यास सांगितलें ; व स्वतःसाठीं हातांत खोरें घेऊन भुयाराचे तोंडा- पाशीं बर्फात स्वतः खणून एक लहानसें बीळ तयार केलें. इतक्यांत ' जसजसें पुढे जार्वे तसतसें तें भुयार अधिकाधिक विस्तृत आहे व त्यांत पन्नास साठ लोकांस आडोसा मिळण्याची जागा आहे असें भुयारांतील लोकांस आढळून आलें. तेव्हां बावरही आंत शिरला व जी थोडीशी शिदोरी शिल्लक होती तिचें सेवन तो व त्याचे अनुयायी यांनी एकेच ठिकाण केलें. दुसरे दिवशीं सकाळीं बर्फ पडणे बंद झाले व वादळ तेव्हां बाबरचें सैन्य पुढे सरसावलें. शेवटीं फेब्रुवा- रीचे अखेरीस तो काबूल येथें दाखल झाला. पण पाहतो तो शहरांत बंडावा झाला आहे आणि किल्ल्यांतील शिपायांनीं जरी अजूनही इमान सोडिलें नव्हतें तरी एकंदरीने प्रसंग मोठ्या आणीबाणीचाच आहे. तथापि बाबर अगर्दी डगमगला नाहीं; व त्या प्रसंगास उचित अशा युक्त्या व कल्पना त्यार्ने योजिल्या. नगरांतील आपल्या पक्षांतील लोकांशीं दळणवळण सुरू करून त्यांस मदतीसाठी तयार करून त्यानें शहरावर एकदम छापा घातला व तें पुनः काबीज करून घेतलें. आंतील बंडखोर लोकांस त्यानें फारच दयाळूपणाने वागविलें. बाबर यास ज्यानें समरकंदाहून पूर्वी हांकून लाविलें होतें, त्या युझवेकांचा सरदार शैबानीखान यानें सार्की, वसंतकाळांत बल्खवर स्वारी करून ते त्यावर्षी, घेतलें. नंतर त्यानें खोरासनावर हल्ला केला व ह्मणजे सन १५०० शहर हस्तगत करून हिरातही बळकाविलें. कंदाहार है शहर त्यावेळीं बऱ्याच अंशी हिरातच्या राजाच्या आश्रया- खालीं असे. सुलतान हुसेन मिरजा याचे राज्यांत तेथें मिरझुलननबेग हा सुभेदार होता. त्याच्या मुलांनीं तें शहर आपल्या स्वाधीन करून घेऊन, शैत्रानी विरुद्ध लढण्यास बाबराचे सहाय्य मागितलें. तदनुसार • बाबर कंदाहारावर चाल करून गेला. मार्गात, पदच्युत झालेल्या सुलतान हुसेनच्या घराण्याचे अनेक पळपुटे अनुयायी त्यास येऊन 3