या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

अकबर बादशहा.

मिळाले. परंतु बाबर कंदाहारास पोहोंचण्यापूर्वीच शैवानाखान यानें फारच नेट केल्यामुळे सुलतान झुलननच्या मुलांनीं त्याचें स्वामित्व कबूल केलें होर्ते. ही गोष्ट त्यांनी बाबर यास अशा रीतीनें कळविली की तिच्या बद्दल त्याला कांहीं शंका उरली नाहीं. सवत्र तलवारीच्या जोराने आपला हक्क स्थापित करण्याची बाबर यार्ने तयारी केली.
 त्याचें सैन्य मोठें नव्हतें ; पण खात्रीचें होतें व स्वतःच्या पराक्रमा- विषय ही त्याला भरंवसा होता. कंदाहारांत मोर्चा फिरल्याचा सुगावा त्यास प्रथम खिलाधिलझाई येथे लागला. तेथून तो टारनाक नदी उतरून पलीकडे गेला. येथून आपली योजना सयुक्तिक आहे अशी खात्री झाल्यावर लढाईच्या बंदोबस्ताने नदीच्या कांठाकांठानें तो कंदाहा- रचे उत्तरेस ५,६ मैलांवर असलेल्या बाबावली मुक्कामीं गेला व त्यानें कालिशादची टेकडी हस्तगत करून घेतली. थोडीशी विश्रांति घेण्याचा होता, ह्मणून त्यानें सैन्याच्या बेगमीच्या वस्तु गोळा करण्यास पाठविलें. जाण्यास फार वेळ झाला नाहीं तच शत्रूचें सैन्य बाबराच्या दृष्टीस पडलें. त्यांत पांच सहा हजार लोक असून ते शहराकडून आपल्याकडे येत आहेत असें त्यानें पाहिलें. तेवेळेस बाबराजवळ हत्यारबंद लोक कायते हजारच होते. बाकीचे लोक दाणागोटा आणण्यास गेले होते. परंतु तीवेळ मार्गे पुढे पाहण्याची नव्हती. हें तेव्हांच त्याचे लक्षांत आलें. बचावास सुलभ अशा रीतीनें सैन्याची व्यवस्था लावून तो शत्रूच्या हल्ल्याची वाट पाहत बसला. या हल्ल्यांत झुलननर्ची मुलें स्वतः पुढारी होतीं व त्यांनीं मोठें शौर्य दाखविलें. परंतु वावराने त्यांना मार्गे हट- वृन यःपलाय करावयास लाविलें, इतकेंच नाहीं तर त्यांचा पाठलाग अशा रीतीने केला की त्यांना शहरापासून अगदी तोडून टाकिलें. असें झाल्यावर तें शहर आंतील एकंदर दौलतीसह बाबराच्या हातीं लागलें. येथें त्यास जी लूट मिळाली ती फारच मूल्याची होती. तथापि तो