या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३ रा.

कंदाहार येथें राहिला नाहीं. आपला भाऊ नसीर मिरझा यास तेथील संरक्षणासाठीं ठेवून तो काबुलास परत गेला ; व जुलै अखेर तेथें पोहों- चला. या मोहिमेंत आपणास पुष्कळ कीर्ति व अपार संपत्ति मिळाली असें जें त्यानें आपले पुस्तकांत लिहिलें आहे तें यथार्थ आहे.

 बाबर तेथें जाऊन पोहोंचला नाहीं तोंच त्यास असें वर्तमान समजलें कीं शैबानीखान कंदाहारावर चालून गेला आहे व त्यानें आपल्या भावास वेढा घातला आहे. आतां काय करावें याची त्यास पंचाईत पडली; कारण शैबानीबरोबर रणांत सामना करण्यास योग्य येवढें सैन्य त्याज- पाशीं नव्हतें. तथापि तो खरा सेनानी असून मोहिम फत्ते कशी करावी या कलेत पूर्ण निष्णात होता. त्याने ठरविलें कीं यावेळेस कोठें तरी एकदम चाल करून हल्ला करणें व शैबानीचें लक्ष कंदाहाराकडून वळ- विणें हेंच आपणांस श्रेयस्कर आहे. परंतु हा हल्ला बदकशानावर करावा व तेथून समरकंदावर जात अशी भीति दाखवावी किंवा हिंदु- स्थानावर करावा यासंबंधीं त्याचें मन द्विधा झालें. अखेरीस हिंदुस्था- नावरच स्वारी करण्याचा बेत त्याने कायम केला. शीघ्र निश्चयाप्रमाणे शीघ्र कर्तृत्व ही अंगी असल्यामुळे काबूल नदीच्या मार्गानें सिंधुनदा- कडेस जाण्याकरितां तो तडक निघाला. तथापि तो जलालाबाद येथें मुक्कामास असतां शैबानीच्या हस्तगत कंदाहार झाल्याची खबर त्यास लागली. यामुळे प्रस्तुतच्या स्वारीचा उद्देश नाहींसा झाला, ह्मणून तो काबुलास परत आला.
 पुढील सात वर्षांत पुष्कळ उलाढाली घडून आल्या; परंतु त्यांचें सविस्तर विवेचन करण्याची जरूरी नाहीं. या सात वर्षांत - १९०७ पासून १९१४ पर्यंत-बाबरार्ने उत्तरेकडे स्वारी करून फरघणा पुनरपि आपले हस्तगत करून घेतला, युझबेकांचा पाडाव केला, आणि बुखारा व समरकंद ही शहरें ताब्यांत घेतलीं. परंतु युझबेक लोकांनीं फिरून "चाक करून कुलमालिका एथें बाबराचा पराजय केला व त्यास हीं