या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०

अकबर बादशहा.

दोन्हीं शहरें सोडून द्याव लागलीं. हीं शहरें पुनः हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न करीत असतां बाबर हा घाजदेवान एथे पराभव पावला; व त्यास हिसार येथे परत यावें लागलें. तेथें आपलें देव उघडण्याची अगदी निराशा आहे अर्से थोडकेच दिवसांत त्याला दिसून आलें ; ह्मणून तो काबुळास परत गेला. ही गोष्ट १९१४ च्या आरंभीं घडून आली.

 यानंतर आणखी आठ वर्षांचा वृत्तांतही थोडक्यांतच सांगितला पाहिजे. या काळांत अफगणिस्थानांतील डोंगराळ प्रांतांतील आपल्या अनिवार प्रजेचें बाबराने पारिपत्य केलें व स्वात हस्तगत करून घेतले व तह करून कंदाहार ही परत मिळविलें तें शहर व त्याचे खालीं मोडणारा प्रांत त्याने ताब्यांत घेऊन आपल्या राज्यास जोडिला हेलमंद नदीच्या मुखाकडील सपाट प्रदेशाचा यांत समावेश होत होता.

 इकडे, झुलनचा वडील मुलगा शहाबेग, जो पूर्वी कंदाहारावर राज्य करीत होता त्यानें सिंध प्रांतावर स्वारी करून तो प्रदेश काबीज केला होता, व बक्कर हे शहर आपली राजधानी करून तो तेथें राज्य करीत होता. तो १५२४ या वर्षी मरण पावला. तैमुराच्या घराण्याचा पक्का पक्षपाती, नरसापुरचा सुभेदार, शहाहासन, यास ही बातमी सम- जतांच त्यानें बाबर हा त्या प्रांताचा राजा झाला ह्मणून द्वाही फिरविली व सर्व सिंध देशांत त्याच्या नांवानें खुतबा ( नवीन राजास चिरायुत्वादि असावें म्हणून मशीदीत होणारी प्रार्थना ) पढविला. पुष्कळ अडचणी आल्या, परंतु अखेर शहाहासन याने सर्व प्रांत जिंकिला व बाबर हा सार्वभौमराजा व त्याचे आपण मांडलिक या नात्यार्ने राज्यकारभार चालविला. अखेरीस, १५२९ या वर्षी त्यास मुलतान येथें स्वारी करण्यास जावे लागलें. त्यानें तेथील किल्यावर चाल केली. व बरेच दिवस वेढा घालून बसल्यानंतर एक दिवशीं छापा घालून तो काबीज केला. मध्यंतरी हिंदुस्थानांत अति महत्वाच्या गोष्टी घडून आल्या होत्या. तारीख १५ एप्रील सन.