या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

> भाग ४ था. २१ १५२६ ई० रोजी पानिपतची लढाई झाली व तींत हिंदुस्थानदेश बाब- राचे हस्तगत झाला. त्यानें या देशावर केलेल्या स्वारीचें वर्णन करण्या- पूर्वी त्या वेळीं विद्यमान असलेल्या राज्यांची हालहवाल कशी होती याचें संक्षिप्त वर्णन करणें अवश्य आहे. तें आपण पुढील भागांत करूया. भाग चवथा. बाबराची हिंदुस्थानावरील स्वारी. ॥ उद्यमेन हि सिद्धयंति कार्याणि न मनोरथैः ॥ ॥ केल्यानें न मनोरथ उद्योगानेंच साधतीं कार्ये ॥ हिंदुस्थानच्या इतिहासातीक पहिला भाग- ह्मणजे अगदीं प्राचीन- काळापासून तों अकराव्या शतकाच्या आरंभी महमूद गिझनीनें स्वारी केली तेथपर्यंतचा-यांतील गोष्टींचा उल्लेख करण्याचा आमचा विचार नाहीं. या काळाची खुलासेवार माहिती फारच थोडी उपलब्ध आहे. इतुकें मात्र खचित आहे कीं, या काळ, सिंधुनदापासून तो कन्याकुमारीचे भूशिरापर्यंतच्या प्रदेशांत निरनिराळ्या जातीचे लोक राहत होते, व त्यांची भाषा आणि आचार विचार एकमेकांहून अगर्दी भिन्न होते, क तेथें ब्राह्मण, बुद्ध व जैन हे तीन मुख्य धर्म प्रसृत होते. निरनिराळ्या अनेक राज्यांत ज्या मधून मधून लढाया होत त्या बहुतेक धर्मसंबंधींच असत. विद्यमान असलेल्या या स्थितीत पहिली गडबड झाली ती महमूद गिझनी यार्ने १००१ या वर्षी हिंदुस्थानावर प्रथमतः स्वारी केली तिचे योगानें. परंतु, महमूद व त्याच्या गिझनी घराण्यांतील वंशजांनी जरी दिल्ली, राजपुताना, व गुजराथ प्रांतांत अगदी शेवटील टोकापर्यंत शिर- • काव केला होता; तरी त्यांची कायमची राज- सत्ता खरोखर पंजाबाचे