या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ अकबर बादशहा. पलीकडे कर्धीच गेली नव्हती. सतलज नदीचे आग्नेयीस हिंदुराजांचेंच प्राबल्य होर्ते. इ. सन १९८६ सालीं गिझनी वंशाचे निर्मूलन घोरी वंशांतील एका राजानें केलें. या घोरी वंशाचा संस्थापक घूर एथीक एक अफगाण होता. घूर हैं हिरातच्या आग्नेयीस काबूलचे रस्त्यावर ६० कोसांवर आहे. पुढे याच प्रमाणें खिलजी अथवा घिलजी घरा- ण्यांतील राजांनीं घुरींचा १२८८ सालीं पाडाव करून आपण गादी बळकाविली. या घराण्यांतील राजांनीं, दिल्ली व हल्लीं आपण ज्यास वायव्येकडील प्रांत ह्मणत, त्या प्रदेशावर तेत्तीस वर्षे राज्य चालवून, मोठी कीर्ति संपादिली. त्यांनीं नर्मदेच्या पलीकडे व दक्षिणेत स्वाय करून त्या प्रांतावर आपला पगडा बसविला. परंतु त्यांस लवकरच उतरती कळा लागली व इ० स० १३२१ सालीं त्यांस तघलख अथवा गुलाम घराण्यांतील एका राजानें पदच्युत केलें. तघलख घराण्यांतील राजांना राज्य जोडून सुव्यवस्थित करण्याची कला साधली नव्हती. ह्मणून, या घराण्याने ९१ वर्षे राज्य केलें त्या अवकाशांत, पूर्वीच्या दिल्लीपतींच्या आधिपत्याखालीं जे प्रांत होते, ते हळू हळू स्वतंत्र झाले; व सन १३८८-८९ सालीं तैमूरनें केलेल्या स्वारीमुळे तर, या हास होत चाललेल्या राज्याचा अगदींच बीमोड झाल्यासारखे झालें. त्यावेळीं गादीवर असलेल्या सुलतान महमदचे हातीं बारा वर्षेपर्यंत हे राज्याधि- पत्य तसेंच रेंगाळत राहिलें. परंतु त्यानंतर सर्व राजसत्ता सय्यद ह्मणून इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या घराण्याकडे गेली; तथापि त्यांनीं राजा ही संज्ञा धारण केली नव्हती. या घराण्यानें तेत्तीस वर्षेपर्यंत उत्तर हिंदुस्थानांत नुसतें नांवाचें राज्य केलें. त्यांचे राज्यांत कांहीं एक संगि नव्हती. शेवटी, ही संधिसाधून लोदी घराण्यांतील एका बलिष्ट अफ सरदारानें सर्व सत्ता आपल्या हस्तगत करून घेण्याची खटपट केली. हिंदुस्थानांत यावेळी विद्यमान असलेल्या मुसलमानी अंमलाची स्थिति अशी होती कीं, अनेक स्वतंत्र सरदार निरनिराळ्या प्रांतांवर