या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ था. २३ स्वतःच्या जोरावर मनास वाटेल त्याप्रमार्णे राज्यकारभार चालवीत असत. सार्वभौम म्हणून कोणा ही एका राजाची त्यांवर सत्ता नव्हती. उदाहर- णार्थ, इ० स० १४५० साली, दिल्ली व तिच्या सभोवतील लहानशा प्रदेशावर सय्यद घराण्यांतील एक पुरुष राज्य करीत होता; व तेथून १४ मैलांच्या आंत मेवाट येथें अहमदखान नांवाचा सरदार स्वतंत्रपणें राज्य करीत होता. संभळ, ज्यास आपण सांप्रत रोहिलखंड झणतों, व ज्याची सीमा दिल्लीचे सीमेशीं केवळ भिडून गेली होती तेथें दर्याखान लोदी यानें आपलें ठाणे बसविलें होतें. इसाखान तुर्क, जलेसर ह्मणजे हल्लींचा इटा जिल्हा येथें राजा असून, राजा प्रतापसिंग हल्ली फरुकाबाद ह्मणतात तेथे होता. दाउदखान लोदीच्या सत्तेखालीं बियाना असे. लाहोर, दिपाळपूर, सरहिंद, व दक्षिणेकडे पानिपतपर्यंतचा प्रदेश बेह- लोल कोदीच्या ताब्यांत होता. आणि मुलतान, जोनपूर, बंगाल, माळवा आणि गुजराथ येथें निरनिराळे राजे स्वतंत्रपणें राज्य करीत होते. सय्यद घराणें नाहींसें झाल्यावर, या बहुतेक प्रांतांत व पूर्वेस पश्चिम- बिहारच्या अगर्दी उत्तरेकडील प्रदेशांत, बेहलोल लोदी, जो इतिहासांत सुलतान बेहलोल या नांवाने प्रसिद्ध आहे, त्यानें आपली सत्ता स्वतंत्रपणे स्थापित केली ( १४५० - १४८८ ). त्याचा मुलगा व वारीस सुळ- तान शिकंदर लोदी, यार्ने बिहार सर करून बंगाल्यावर स्वारी केली; पण तेथील राजा अल्लाउद्दीन यास तो प्रांत परत देऊन त्यावर पुनः स्वारी न करण्याचें शिकंदर लोदीनें कबूल केलें. नंतर त्यानें मध्यहिंदुस्थानां- तील बहुतेक भाग व्यापून टाकिला. पंजाब या नांवाने प्रसिद्ध असलेला प्रांत, आपल्या मरणसमय, सांप्रत जोनपूर समेत वायव्येकडील प्रांत, बहुतेक सारा मध्यहिंदुस्थान, व पश्चिम बिहार, इतका मुलूख त्यानें स्वतःच्या एक-छत्राखालीं आणिला होता. परंतु वास्तविक रीत्या हैं। • एक छत्र नांवाचें मात्र होर्ते. ज्या अफगाण अमीरांच्या स्वाधीन सुल-