या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ अकबर बादशहा. तान लोदी यास आपल्या राज्यांतील निरनिराळे प्रदेश करावे लागले, ते आपलें सामंत्य कबूल करीत व लढाईचे प्रसंगीं बादशाहास मदत वैगेरे देत हे खरे; परंतु दरएक सुभेदार आपआपल्या ताब्यांतील प्रांतांत स्वतंत्रपणे व आपल्या इच्छेनुरूप राज्यकारभार चालवी, व आंतील व्यवस्थेत सार्वभौम राजास कोणतेही रीतीनें हात घालूं देत नसे. या स्थितीचा परिणाम असा झाला कीं, जेव्हां सुलतान शिकंदर मरण पावला तेव्हां, यांपैकी बहुतेक मोठमोठ्या सरदारांस ही नांवाची तावेदारी देखील सहन होईना ह्मणून त्यांनी एकविचार करून असा निश्चय केला की मयत सुलतानाचा मुलगा इब्राहीम यास फक्त दिल्लीचें आधिपत्य देऊन बाकीचें सर्व राज्य आपसांत वांटून घ्यावें; फक्त जोनपूर हा प्रांत मात्र इब्राहिमाच्या धाकट्या भावास, दिल्लीचा मांडलिक, या नात्याने द्यावा. इत्राहिमखान यार्ने प्रथमतः या व्यवस्थेस अनुमोदन दिले; पण तें निरुपायास्तव दिलें असावेंसें दिसतें; कारण त्यास त्याचा नातलग खान जाहान लोदी याने समजाच्या दोन गोष्टी सांगितल्या बरोबर, त्याने आपली संमति माघारी घेतली, व आपला भाऊ जोन- पुरास जाण्यास पूर्वीच निघाला होता त्यास परत बोलाविलें. परंतु तो येईना, तेव्हां उभयतः बंधूंत लढाई सुरू झाली; त्यांत इब्राहिम यशस्वी आपला भाऊ मरण पावल्यावर १९१८ साली इब्राहिमखान यानें आपल्या महत्वाकांक्षी सामंत सरदारांवर आपला अंमल पुनरपि " बसविण्याची खटपट केली. त्यांनी बंड केलें पण त्यांचा त्याने मोड केळा. जय मिळाल्यावर त्यार्ने उदारपण व शाहाणपण दाखविलें नाहीं यामुळे असंतोष वाढून पुनः बंडावा सुरू झाला. बहार, अयोध्या जोनपूर एथील सुभेदार सशस्त्र होऊन लढाईस उभे राहिले; व पंजाबचे सुभेदार ही त्यांस येऊन मिळाले. पुढे झालेला संग्राम मोठ्या निक- राचा झाला ; व त्यांत आज या पक्षाची सरशी तर उद्यां दुसरे पक्षाची व्हावी. याप्रमार्णे चालतां चालतां जेव्हां अगर्दी आणी बाणीचा प्रसंग येऊन झाला.