या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ था. २७ आपकी सत्ता निर्बाध असून तेथीक पाठबळ आपणांस पाहिजे. ह्मणून तो किल्ला व गिझनी आणि खोरासन यांच्यामधील मुलूख हस्तगत करण्यांत त्याने पुढील दोन तीन वर्षे घांकविलीं. ह्या प्रांतांत स्थिरस्था- वर होऊन त्याची सत्ता मजबूतशा पायावर बसून फार वेळ झाला नाहीं तोच अल्लाउद्दीन लोदी व लाहोरचा दौलतखान यांचे पूर्वी सांगितल्या- प्रमार्णे निरोप पोहचले. दौलतखानाचा निरोप येतांच हिंदुस्थानावर चवथी स्वारी करण्यास बाबर सिद्ध झाला. पुनः एकदां तो सिंधु, जेह- कम व चिनाब ओलांडून लाहोरावर सरसावळा ; व त्या शहराच्या अळी- कडे ५ कोसांवर तळ देऊन राहिला. तेथें लोदीघराण्यांतील अनुयायी .. सरदारांच्या सैन्याश बाबरचा सामना व त्याच्या सैनिकांनी लाहोर लुटलें. मुक्काम केला. होऊन त्यानें त्यांचा पराभव केला, नंतर तेथें त्यानें चारच दिवस मग पुढे चाक करून जाऊन दिपाळपुरावर हल्ला करून तें काबीज केलें. येथें दौलतखान व त्याचीं मुळे हीं बाबर यास येऊन मिळालीं; परंतु बाबराने दिलेलें बक्षीस त्यांच्या मनांत भरले नाहीं ; व असंतुष्ट होऊन ते आपल्या नवीन स्वामीविरुद्ध फंद फितूर करूं लागले. हे त्यांचे कौटिल्य बाबर सरहिंदाकडे जात होता तेव्हां त्यास कळले. तेथून तो दिल्लीवर जाणार होता; पण तो इरादा तितक्या पुरता महकूब करून काबुलास परत जाण्याचा त्यांनें निश्चय केला. विश्वासू ह्मणून वाटके त्या सरदारांना पंजाब वांटून देऊन तो तिकडेस गेला. बाबर सिंधुनद उतरून पऴीकडे गेला नाहीं तोंच पंजाबांत पुनः बखेडा सूरू झाला. दिपालपूर ह्मणून लाहोरचे नैर्ऋत्येस ४० मैलांवर त्यावेळेस अति महत्वाचें असें एक शहर होर्ते. तें त्यानें अल्लाउद्दीन लोदी याचे स्वाधीन केलें होतें. तो या झगड्यांत जेरीस आला व 'निराश होऊन बाबर यास हिंदुस्थानावर पुनः स्वारी करण्यास घेऊन यावे. अशा उमेदीनें काबुलास गेला. त्यानें आपला मनोदय त्यास कुळविला परंतु बाबर यास त्याचें झणर्णे. त्याच क्षणीं कबूल करवेना,