या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ अकबर बादशहा. झबेक लोक तेवेळीं बल्खला वेढा घालीत होते. तथापि, त्यानें अल्ला- उद्दीन यास सैन्याची मदत दिली, व पंजाबांत असलेल्या आपल्या सेना- पतींना त्यास साहाय्य देण्याची आज्ञा केली. परंतु, या मोहिमेंत ह्या राजपुत्रास फिरून अपयश आर्के व तो घाबरून दिल्लीहून पंजाबात पळाला. या अवसरांत बाबर हिंदुस्थानावरील पांचव्या ह्मणजे त्याचे शेवटच्या मोहिमेची तयारी करीत होता. या मोहिमेचा वृत्तांत : आह्मांस थोडक्यांतच सांगितला पाहिजे. आपला मुलगा हुमायून यास बरोबर घेऊन खैबर खिंडीतून बाबर पेशा- वरांत उतरला. तेथे दोन दिवस मुक्काम करून तारीख १६ दिसेंबर रोज सिंधुनद ओलांडून तो झपाट्यानें सियाळकोटास गेला. तेथें पोहचल्यावर ( तारीख २९ दिसेंबर ) अल्लाउद्दीन पराभव पावून पळून गेल्याची बातमी त्यास समजली. तरी न डगमगतां तो दुसरे दिवश सकाळीं परसासोर येथे जाण्यास निघाला. व रावी नदीवरील कलानार याच्यामध्ये आहे. हे ठिकाण सियालकोट तेथून तो कळानार येथें गेला. वं त्याने रावी नदी ओलांडली. पुढे बिया नदीच्या पार जाऊन . तो मिळवटच्या मजबूत किल्ल्यांत जाऊन थडकला. येथें त्याचा पूर्वीचा अनुयायी दौलतखान आश्रा करून राहिला होता. मिलवटचा किल्ला लव- करच हस्तगत. झाला. पुढे त्यानें लिहिलें आहे त्याप्रमाणें 'निश्चयाच्या रिकाबत पाय ठेवून व ईश्वरावरील भरवसा हा लगाम हातांत घेऊन,' तो जांलंधर-दुआबामधून सतलजवर गेला व रुपार येथे ती ओलांडून यमुनातीरीं सिरसावाच्या समोर दाखल झाला व तिच्या कांठानें दोन आणखी दोन मजला गेल्यावर दिल्लीच्या वाय- व्येस ५३ मैलांवर पानिपत येथें पोहोंचला. तेथें त्यानें मुक्काम करून आपल्या गोटाची मजबुती केली. ही गोष्ट तारीख १२ एप्रील १५२६ रोज घडली. मजला वाट चालला. 'बाबराने आपले तळाभोंवत खंदक खणविला होता. या ठिकाणी