या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. २९ • त्याचें सैन्य आठ दिवस राहिलें. नववे दिवशीं इब्राहिम लोदी बाबरावर मोठ्या सैन्यानिशीं चाल करून गेला. हें सैन्य एक लाखभर असावे असा बावराचा अजमास आहे. सूर्य क्षितिजापासून भालाभर उंच चढला होता, तेव्हां युद्धास सुरवात झाली, तें मध्यान्हपर्यंत एक सारखे चालूच होतें. दुपारी शत्रूच्या सैन्याचा अगदीं पाडाव होऊन दाणादाण झाली ; व जयश्रीनें निःशंकपर्णे बाबराच्या गळ्यांत माळ घातली. इत्रा - मोदी शूरपणे लढत असतां रणांत पडला व हिंदुस्थान बाबरच्या हातांत आलें. त्यानें त्याच दिवशीं दिल्ली व आग्रा काबीज करण्या- करितां आपले सैन्य खाना केलें. हीं शहरें तारीख २४ माहे एप्रील व तारीख ४ माहे मे इसवी रोजों, अनुक्रमें बाबराच्या हस्तगत झाली. बाबराने आपले चरित्रांत आपण लहान, सान युद्धे करता करतां मोठे होऊन शेवटीं हिंदुस्थानासारखा मोठा, नामी, व भव्य देश कसा काबीज केला याचें वर्णन करून अर्से लिहिलें आहे की " हा दिग्विजय माझ्या पराक्रमानें प्राप्त झाला असें मी मानीत नाहीं व हा येवढा मोठा भाग्यो- दय माझ्या श्रमानें झाला असेंही मी समजत नाहीं ; हे केवळ परमेश्व- राच्या दयेचें व कृपेचें फळ होय. " कवीनें गाइर्केच आहे की 'सुपुरुष विनयातें भाग्यकाळ घरीती. ' भाग पांचवा. हिंदुस्थानांतील. बाबराची सत्ता व स्थिति. ॥ विकार तौ सति विक्रियन्ते ॥ येषां न चेतांसि त एव धीराः ॥ ॥ विकार हेतू असुनी विकार ॥ चित्ता न ज्यांचे जागं तेच धीर ॥ हिंदुस्थानचे वायव्येकडील दोन्ही राजधान्यांचा स्वामी झाल्यावर बाबर यानें त्या देशाची वास्तविक स्थिति कशी आहे ती दूरदर्शी मुत्स- • द्याच्या दृष्टीनें अजमावली. आपण कायते उत्तर हिंदुस्थानचेच मालक