या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० अकबर बादशहा. आहत हैं तात्काल त्याच्या लक्षांत आर्के. अयोध्या, जोनपूर, आणि पश्चिम बिहार या प्रांतांतील लोकांनीं इब्राहिमाविरुद्ध बंड केलें होतें; व त्यांचा पाडाव करण्याकरितां त्या बादशहाने सैन्य पाठविलें होतें; तथापि, हे दोन्ही पक्ष एकत्र होऊन आपणावर उठतील असे बाबर यास पक्केपण दिसून आलें होतें. याशिवाय बंगाल, गुजराथ आणि . माळवा हीं तीन राज्र्ज्ये नसरतशाहा, शिकंदरशाहा, आणि सुलतान महंमद यांचे अंमलाखालीं असून बलाढ्य व स्वतंत्र अशीं होत. माळव्याचा कांहीं भाग, ह्मणजे चंबळ आणि बनासच्या संगमावर असणारें रणथंबोर, काली सिंधूच्या कांठचें सारंगपूर, व बेटांवा नदीच्या तीरीं असलेले भिल- सावचंदेरी, आणि चितूर येथील त्याकाळी प्रसिद्ध असलेले बळकट किल्ले ज्यांत होते, तो मुलूख विख्यात संगराणा यार्ने जिंकून आपले काबीज केला होता. दक्षिणेत ब्राह्मणीराज्यांची स्थापना झाली असून विज- यानगरचा राजा स्वतंत्रपणे आपला अखत्यार गाजवीत होता. या- शिवाय जे मुसलमानी सत्तेखालीं कधींहीं आले नव्हते असे आणखी पुष्कळ राय व राजे होते. तथापि, या अनेक राजांची स्वतंत्रता ही कांहीं आपल्या दिग्विजयास सर्वात मोठीशी अडचण नाहीं, हें बाबराने तेव्हांच ओळखिलें. त्यास सर्वांत मुख्य ही अडचण दिसली कीं हिंदु प्रजा मागील मुसलमान राजांनीं राजी करून न घेतल्यामुळे ती त्यासही अगर्दी प्रतिकूळ होती. अस्कीन साहेबानीं लिहिल्याप्रमाणे, उत्तर हिंदुस्थानांत प्राचीन हिंदुराज्यपद्धति अझूनही बहुतेक कायम होती; ह्मणजे गांवाची व परगण्याची वहिवाट व अंमल करण्याची रीत, एकंदर मुलुख अनेक लहान लहान संस्थानांत व छोटेखानी मामलतींत विभागण्याचा संप्रदाय, आणि राज्यक्रांतीच्या वेळ मुख्य राजधानींत राहून सत्ता चालविणाऱ्या राजाची पर्वा न बाळगता प्रजाजनांनीं आपल्या सन्निध असलेल्या अंमलदाराचीच आज्ञा मान्य . करण्याची वहिवाट, या सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच प्रचलित होत्या. अशी. (