या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. ३१ स्थिति असल्यामुळे हा काळपावर्ती सर्वात श्रेष्ठ अशा एकाच सार्वभौम राजाकडून हुकूम सुटून एकतंत्राने चालणाऱ्या व्यवस्थित राज्यपद्धतीचा अनुभव कोकांस नव्हता; ह्मणून नवीन जय मिळालेला बाबर हा त्यांस परकीय शत्रूच वाटला व त्यास घालवून देण्यांत आपले हितच आहे अर्से ही ते समजत होते. • शिवाय, बाबर यार्चे शील व स्वभाव अगर्दी अपरिचित असल्यामुळे त्याविषयीं लोकांस सहजच दहशत वाटली ; व तींत पदच्युत झालेल्या मुसलमानी राजघराण्यांच्या अनुयायानीं चाळविलेल्या कृष्णकारस्थानाची भर पडली. यांनी लोकांना सांगावें कीं मोंगलांचा विजय झणजे हिंदूचा नाश. हे मध्यएशियांतील रानटी लोक तुमच्या देवालयांचा सत्यानास करतील व तुमच्या बायकांची व मुलींची अत्रु घेण्यास कर्धीही मार्गे पुढे पाहाणार नाहींत, अर्से हिंदुलोकांच्या मनांत भरविण्याचा त्यांनी सतत अतोनात प्रयत्न केला. यामुळे दयाळू व उदार अंतःकरणाचा बाबर स्त्रारी करीत जसा आग्र्याजवळ येऊं लागला तसतसें हिंदुलोक अगो- दरच भयाभीत होऊन गेले होते ते आपल्यावर आतां खास जुलूम होणार त्यापेक्षां अरण्यवासांतील संकटें बरीं असें समजून शहर सोडून पळून गेले. बाबराच्या अडचणींत जास्त अडचण ही उद्भवली कीं त्याच्या अनु- यायांत असंतोष उत्पन्न झाला. त्याच्या सैन्यांत बहुतेक पूर्व अफग- णिस्थानांतील उंच डोंगरावर राहणाऱ्या कडव्या लोकांचा भरणा होता. - जोंवर कढाईची आशा होती तोवर ते मोठ्या उल्हासाने आपल्या राजा बरोबर गेले; परंतु पानिपतच्या कढाईंत उत्तर हिंदुस्थान त्यांना मिळार्के, तेव्हां लढाईचा संभव कमी झाला. पुढे दिल्लीहून आग्र्याचा कूच निर्जन व रखरखीत प्रदेशांतून करावा लागला. तशांत त्या वेळी उन्हा- ळ्याचे दिवस होते व त्या सालचा, ह्मणजे १९२६ चा उन्हाळा ही नेहमीपेक्षां फारच प्रखर होता. ह्या एकंदर कारणांनी त्याचे कोक