या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ अकबर बादशहा. फार कुरकूर करूं लागले व आपल्या अफगणिस्थानांतील डोंगरांतील घरीं परत जाण्यांविषयीं फारच उत्सुक झाले. हा असंतोष फक्त शिपायांतच नव्हता. मोठमोठे सरदार ही अशीच कुरकूर करूं लागले; व ती इतकी वाढली कीं अखेरीस ती बाबराचे कानापर्यंत जाऊन पोहोंचली. बाबराची चित्तवृत्ति मिळालेल्या जयानें फारच प्रसन्न झालेली होती. आपण अतिशय मौल्यवान, अत्यंत सुपीक, व फारच सुंदर असा एशियाचा भाग काबीज केला आहे, या गोष्टीचा, तेथील प्रचंड उष्णता अथवा तेथील लोकांचा असंतोष या दोन्ही कारणांनी त्यास विसर पडला नाहीं. नवीन संपादन केलेल्या देशाचा महिमा त्यानें स्वतः लिहिलेल्या अलौकिक चरित्रांत विस्तारपूर्वक वर्णिला आहे. या वर्ण- नास छापिलेली मोठमोठीं बीस पार्ने लागली आहेत. त्यानें लिहिलें आहे कीं “ हा देश फारच छानदार आहे व आपल्या देशार्शी तुलना केली असतां है अगर्दी भिन्न असे नवीन जगच आहे. " मिळविलेला जय कायमचा करणें हेंच आपले आतां कर्तव्य, अर्से त्यास स्पष्ट दिसून आलें. इतउत्तर हिंदुस्थानचा बादशहा या मोठ्या पदवीपुढें काबूलचा राजा' हा किताब त्यास तुच्छ वाटू लागला. काबुलास परत जावे हा विचार आतां त्याचे मनांत देखील येईनासा झाला. आपल्या सर्व अडचणी त्याच्या लक्षांत आल्या होत्या व त्यांच्या प्रति- काराचे उपाय ही त्यानें योजून • ठेविले होते. व्यवहारचातुर्यंत तो अतिशय दक्ष असल्यामुळे वास्तविकरीत्या जे सर्वाहून मोठे संकट, ह्मणजे सैन्यांतील असंतोष, तें निवारण करण्याच्या उद्योगास तो प्रथम लागला. त्यानें आपल्या सरदारांची व अमीरांची सभा भरवून त्या 'वेळच्या प्रत्यक्ष स्थितीर्चे चित्र त्यांच्यापुढे मांडिलें. तो ह्मणाला, 66 • आपण येतांना मार्गात किती संकटें भोगिलीं, आपणांस किती प्रयास पडले, रक्तस्रावाच्या किती लढाया माराव्या लागल्या, तेव्हां कोठें हेο