या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

उलसीने मोठ्या एकनिष्ठेनें दीर्घकालपर्यंत आठव्या हेनरीची चाकरी केली, परंतु अखेरीस वृद्धापकाळीं मरणसमयीं त्यास दरबारांतून गाशा गुंडाळावा लागला व एका भिकारड्या मठींत देहावसान ठेवावें लागलें. बहिरामखानानें अकबरास हिंदुस्थानासारखें प्रचंड राज्य मिळवून दिलें; परंतु बादशहाची मर्जी रुष्ट होतांच त्यास हद्दपार जावें लागलें. कोलं- बसाने दीर्घायास सहन करून व नाना संकटें भोगून नवीन अमेरिका खंडाचा शोध लावला व तो विस्तीर्ण प्रदेश आपल्या राजास अर्पण केला तरी त्या राजाची मर्जी खपा होतांच त्यास या नूतन खंडांतून शृंखलाबद्ध होऊन यावें लागलें. मनुष्यावर निष्ठा ह्मणून ठेवितां कामा नाहीं. स्नेही व इष्टमित्र यांपासून देखील कधीं कधीं दगे होतात.
 ईश्वरावर मनोभावें निष्ठा ठेवावी एवढेच नाहीं तर मनांत निरंतर त्याचीच भीति बाळगावी व जनापवादाकडे बिलकुल लक्षसुद्धां देऊ नये, असाही चरित्र वाचनापासून बोध होण्याजोगा आहे. " परमेश्वर माझा साथी आहे" अर्से ज्यास ह्मणतां येईल त्यास कोणाचेंही भय नाहीं. बुद्ध तुकाराम, एकनाथ व सांक्रेटीस यांस नानाप्रकारचे जाच व यातना सहन कराव्या लागल्या; अनेक प्रसंगों त्यांची हुर्यो उडाली; नाहीं नाहीं त्याप्र- कारें दुष्ट लोकांनी त्यांची फजिती केली, तथापि अखेरीस ते सर्व जगास वंदनीयच होऊन बसले. जगाचा उद्धार करण्याकरितां ह्मणून ज्यांनीं ज्यांनीं अविरत श्रम केले, त्या सर्वांना कष्ट भोगावे लागले, छी थू सहन करावी लागली, लोकांच्या शिव्या खाव्या लागल्या ; इत्यादि गोष्टींचें मनन केलें असतां एखाद्या निरहंकारी आधुनिक सुधारकास केवढा बरें पाठिंबा मिळण्यासारखा आहे. त्यांची ती थोर सहिष्णुता, परहितैकबुद्धि व स्वहितत्याग इत्यादि गुणांच्या विचारांनीं ज्यांच्या मनांत निदान क्षण- मात्र तरी अनुकरणेच्छा व स्फूर्ति उत्पन्न होणार नाहीं असे हरीचे लाल फारच