या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

D भाग ५ वा. ३३ अनेक विशाळ व श्रीमान् असे प्रदेश आपल्या हात लागले. ते टाकून आतां कालास परत जाणें हें मोठें कज्जास्पद आहे. तेव्हां जो कोणी माझा,स्नेही ह्मणवितो त्यानें इतःपर मजपाशीं अशी गोष्ट काढूं ही नये. परंतु, तुमच्यापैकीं ज्या कोणास येथें राहवत नसेल किंवा परत जाण्याचा हेतु सोडवत नसेल, त्यानें खुशाल चालतें व्हावें " या भाषणाने त्याला पाहिजे होतें तें साधकें. पुढें बोलण्याचा प्रसंग जाऊन पुनः करणी करून दाखविण्याची वेळ आली. नवीन लढाया माराव्या लागल्या व नवीन जय मिळाले; तेव्हां सैन्यांतील असंतोष नाऊन उल्हास व आवेश पुनः जागृत झाला. . त्याचे निग्रहाचें फळ बावरांस आणखी दुसऱ्या एका तन्हेने मिळाले. ह्या देशचे रहिवासी, ह्मणजे घरदार करून राहिलेले मुसलमान व हिंदु जमीनदार आणि व्यापारी, यांस बावराचा या देशांत चिरस्थायी राह- ण्याचा हेतु आहे असें समजतांच, त्यांची भीति पळाली. त्याच्या उदार अंतःकरणाची व प्रौढ स्त्रभावाची लोकांस अनेक प्रत्यंतरें आल्या- मुळे त्याविषयींचा त्यांचा ग्रह लागलीच बदलला. आणि त्याचे सैन्यास व त्याचे पक्षास दररोज नवीन नवीन लोक येऊन मिळू लागले. खेड पुनः वसीं व व्यापारी व उदमी लोकांनीं पुनः आपली दुकानें उघडलीं व उद्योग धंदे सुरू केले. बाबराचे गोटांत हरएक वस्तूची समृद्धि झाली. आणखी, थोडे दिवसांतच जोनपूर आणि अयोध्या ह्या प्रांतांतील बंडावा मोडण्यास इब्राहिम लोदीनें पाठविलेल्या सैन्यानें बाब- राचे सार्वभौमत्व मान्य केलें. इतुक्या अवसरांत मोठ्या शहाणपणानें त्यानें आपले सैन्य रोहिलखंडावर पाठवून त्याचा बराचसा भाग जिंकिला, यमुनानदीवरील रावेरी नावाचे महत्वाचे स्थळ काबीज केलें, आणि इटावा व दोलपूर यांस वेढा घातला. परंतु मध्यहिंदुस्थानांत संकटें मी झणून उभी राहिलीं तीं अशा दिशेकडून आर्लीीं कीं त्यांची उपेक्षा • करितां येईना. ⚫.5