या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ अकबर बादशहा. . हीँ संकटें चितूरचा राजा राणा संग याच्या पराक्रमानें उद्भवलीं होती. या महाप्रतापी महाराजाने ( महाराज या पदास कोणत्याही अर्थाने पाहिलें असतां तो पात्रच होता ) प्राचीन मुसलमान राजां- पासून आपल्या वडिलोपार्जित राज्यापैकीं बराचसा भाग हस्तगत करून घेतला होता है मार्गेच सांगितलें आहे. त्यानें आपला पराक्रम याहून ही अधिक गाजविला होता. बंकराळ व चटोली या दोन्ही निक- राच्या लढायांत त्याने इब्राहिम लोदीचा पराभव केला व याशिवाय १६ लढाया मारून निरनिराळ्या सरदारांचा पराभव केला होता. बावर हिंदुस्थानांत येण्यापूर्वी, त्या काळचा प्रसिद्ध रणथंबोर नांवाचा किल्ला त्यानें काबीज केला होता. इतके झाले तरी त्याची विजयपरंपरा सुरूच होती. इतुक्यांत रणथंबोरंच्या पूर्वेस थोड्या अंतरावर असलेला कंदरचा मजबूत डोंगरी किल्ला या रणशूर रजपूत राजार्ने जिंकिला ही ताजी बातमी आली. यामुळे बाबराचे मनास अर्थातच अस्वस्थता उत्पन्न झाली. पावसाळा संपण्याच्या सुमारास, ह्या व दुसऱ्या संकटांचा प्रतिकार कसा करावा याचा विचार करण्यास बाबराने दरबार भरविला. या दर- बारांत असें ठरलें कीं बाबराचा वडील मुलगा हुमायून- - या वेळी त्याचें वय कायतें १८ वर्षांचेंच होर्ते —यार्ने पूर्वेकडे स्वारी करून दुआब, अयोध्या आणि जोनपूर हा मुलूख पूर्णपर्णे सर करावा, व बाबरानें आग्रा येथें राहून एकंदर कारभाराच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवावी. घरा- जवळील शत्रूंचा बंदोवस्त झाल्यानंतर मग राणा संग याकडे वळावे • असा विचार ठरला. 'हुमायुनाची स्वारी अगर्दी यशस्वी झाली. बिहारच्या सरहद्दीपर्यंतचा सर्व प्रांत त्यानें काबीज केला. तो परत आल्यावर, तारीख ६ माहे जानेवारी सन १९२७ रोजीं, बाबराने बियाना व ढोलपूर जिंकले व छापा घालून मोठ्या चातुर्यानें ग्वालेरचा किल्ला हस्तगत केला. इतक्यांत