या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ वा. ३५ मुलतान वश झाल्याची खबर आली. याप्रमाणें सिंधु नदापासून पश्चिम बिहारपर्यंत व काल्पी आणि ग्वालेरपासून तो हिमालयपर्यंतच्या प्रदेशाचें. प्रभुत्व निष्कंटक रीतीनें प्राप्त झाल्यावर, चितूरचा प्रख्यात राजा, राणा संग याजकडे बाबराने आपली दृष्टि फिरविली. या राजाच्या सैन्याशी सामना करण्याकरितां तोः तारीख ११ फेब्रुवारी रोजी आग्र्याहून निघाला. इकडे इब्राहीम कोदीच्या पक्षाकडील मुसलमान लोकांची फौज संग राण्यास येऊन मिळाली. तीसह तो ही पुढे सरसावला व बिसावर एथें - तळ देऊन राहिला. हे स्थळ बियानाहून १२ मैल व बियानाच्या रस्त्यानें आग्र्याहून ६२ मैल आहे. बाबर शिक्रीवर हल्लींच्या फत्तेपूर शिक्रीवर- चाल करून गेला व त्यानें तेथें तळ दिला. यानंतर ज्या बन्याच लहानसान चकमकी उडाल्या त्यांत रजपुतांचीच सरशी झाली व बाबराच्या सैन्याचा अगर्दी हिरमोड झाला. सबब आपल्या सैन्यापैकीं एका तुकडीस मेवात लुटण्यास पाठवून व आपला गोट होईल तितका मजबूत करून कांहीं वेळपावेतों बाबर स्वस्थ बसला. गोटांत कोंडुळेला, युद्धाचें स्वरूप बदलून गेल्यामुळे नाउमेद झालेला, व कांहीं करतां येईना ह्मणून अस्वस्थ झालेला बाबर आपल्या आयुष्यां- 'तील गोष्टींची झडती घेऊं लागला. तेव्हां आपके कुराणांत दाख पिण्याची सक्त मनाई असून आपण त्या आज्ञेचें नित्य उल्लंघन करीत आर्हो ही गोष्ट त्याचे ध्यानांत आली व त्याने पश्चात्तापूर्वक व 'अंतःकरणानें तो अपराध आपले पदरीं घेतला. " पश्चात्तापेन शुध्यति " या उक्तीप्रमार्णे शुद्धांतःकरण होऊन तो प्रमाद नाहींसा करून टाक- ण्याचा त्याने निश्चय केला. मदिरापान करण्याचे सोन्याचे प्याले व चांदीचीं पंचपात्रे आपल्या समोर ताबडतोब आणवून त्यानें तीं मोडून चिकलीं व आलेलें मोल गरीब अनाथांस वांटून दिलें.. गोटांतील सर्व दारू जमीनीवर ओतून टाकिली. या त्याच्या कृतीचें अनुकरण त्याच्या तीन सरदारांनी ही पण केलें.