या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ सरसावला. अकबर बादशहा. • अखेरीस आपण आहों ही स्थिति फार दिवस टिकणार नाहीं असें समजून, मार्च महिन्याच्या १२ वे तारखेस बाबर शत्रूकडे दोन मैल नंतर मुक्काम करून, पुनः दुसरे दिवशीं कूच केलें; व लढाईस योग्य अशी जागा स्वतः शोधून त्या ठिकाणीं त्यानें तळ दिला व संग्रामास योग्य अशा व्यवस्थेनें दळभार रचिला. तारीख १६ रोज रजपूत व त्यांच्या पक्षाकडील लोक पुढे सरसावले व लढाई जुंपली. या युद्धाची हकीगत आपल्या चरित्रांत बाबराने फार मनोवेधक व निःसंशय सत्यास अनुसरून अशीच लिहिली आहे. येथें इतके कळविणे पुरें को ह्या कढाईत संग राण्यास मोठी जखम लागळी व त्याच्या पक्षाकडील निव- डक सरदार मारले गेले, आणि त्याच्या सैन्याचा पूर्ण मोड झाला. या वेळेस मिळालेला विजय इतका निर्णयात्मक होता की दुसरे दिवशीं सर्व राजपुताना बाबरचे हातांत आला. पुढें त्यानें एकदम बियानावर लगट केली व तेथून तो मेवातावर गेला; व तो सर्व मुलूख आपले आज्ञांकित केला. या विजयाचे परिणाम काबीज केलेल्या प्रांतांवरच झाले असें नाहीं, तर ते फार दूरवर पसरले. दुआबामधील ज्या शहरांनी बंडावा केला होता त्यापैकीं कित्येकांनीं आपण होऊन बाबराचें अधिपत्य मान्य केलें व बाकीचीं शहरें पुनः त्याचे अंमलाखाली आली. दुआबांत स्थिर- स्थावर झाल्यावर प्रथमतः मध्यहिंदुस्थानांतील हिंदु सरदारांकर बाबराने शस्त्र उगारिलें. यावेळीं त्यांचा नायक चंदेरी येथील राजा होता. बाबर चंदे- रीष्या किल्ल्याजवळ जाऊन पोहचला, इतक्यांत, पूर्वेकडे गेलेले आपले सर- दार अपयश पावळे व त्यांस. लखनौहून कनोज येथें पळ काढावा लागला अशी बातमी त्यास कळली. त्या खबरीचे महत्व जरी त्यास दिसून आलें, तरी त्यामुळे काडीमात्र न डगमगतां त्यानें चंदेरीचा वेढा मोठ्या धीरानें कायम ठेवला; व थोड्याच दिवसांत तेथील किल्ला हल्ला करून घेतला. हा मुलुख. आपल्या आधीनसा केल्यावर बाबराने आपला . मोर्चा पूर्वेकडे वळविला; व तो आपल्या पराजित झालेल्या सेनापतींना