या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

० भाग ५ वा. ३७ कनोजपाशीं जाऊन मिळाला. तेथें त्यानें गंगेवर पूल केला, शत्रूंस, ह्मणजे बाकी राहिलेल्या लोदीच्या अनुयायांस पळावयाला. लाविलें व लखनौ पुनः काबीज केलें, गोमती व गोमा ओलांडल्या व निरुत्साह झालेल्या शत्रूंची फांकाफांक करून टाकिली. नंतर जीं राज्यकारभा- राचीं सूत्रें तो प्रथम जुळवीत होता तो जुळविण्याचें काम पुनः हातीं घेण्याकरितां तो आग्र्यास परत गेला. परंतु त्यास फार वेळ स्वस्थ राहतां आलें नाहीं. जोनपूर येथे जुन्या मुसलमानांची जी एक फळी होती ती अद्यापि पूर्णपणें वश झाली नव्हती. जीनपूरच्या शेजारचे बिहारचे श्रीमान राज्यावर अद्यापि स्वारीही झाली नव्हती. या दोन्ही प्रांतांतील मुसलमान सरदारांनीं बेत केला कीं, हीं संस्थानें मिळवून एक नवीन राज्य करावे व लोदी घराण्यांतील ज्यां राजपुत्रार्ने संग राण्यास बाबरच्या विरुद्ध मदत केली होती त्यास तेथील राजा करावें. हा कट फारच गुप्त रीतीनें चाळला होता. त्याचा सुगावा तारीख १ फेब्रुवारी १९२९ पर्यंत बाबर यास मुळींच कागला नाहीं. य़ा वेळीं तो घोलापूर एथें होता हैं. शहर त्याचे फार आवडीचें होतें; व यांत बागबगीचे करून व इतर साधनांनीं तें रमणीय व मनोहर करण्यांत आपल्या सरदारांसह तो या वेळीं निमग्न झाला होता. तथापि त्याच दिवशीं तो आग्र्यास परत गेला व जवळ सांपडलें तितकेंच सैन्य घेऊन दुसरे दिवशीं कूंच करून आपला मुलगा अस्कारी याच्या सैन्यास डाकडकी येथे जाऊन मिळावें झणून निघाला. डाकडकी हे खेडें त्या वेळेस अति प्रसिद्ध असलेल्या करा शहराजवळ गंगानदीच्या उजवे तीरीं आहे. येथें बाबर ता० २७ रोर्जी पोहोचला व त्यास अस्का- रीची फौज नदीच्या पलीकडील कांठास दिसली. त्यानें शाहाजाद्यास एकदम असा हुकूम फरमाविला की नदीच्या उजव्या कांठाने मी जसा चालेन त्या धोरणानें तूं ही डाव्या कांठानें चाल.. येथें आल्यावर ● बाबरास जी बातमी समजली ती असमाधानकारकच होती. मह-